तळेगाव दाभाडेमध्ये अडीच वर्षांच्या मुलाच्या अपहरणाचा प्रयत्न, संशयिताला अटक
By रोशन मोरे | Updated: October 20, 2023 17:57 IST2023-10-20T17:56:30+5:302023-10-20T17:57:04+5:30
पोलिसांनी मनीषकुमार बिनोद दास (वय २७, रा. सुरसंड, सीतामढी, बिहार) याला अटक केली....

तळेगाव दाभाडेमध्ये अडीच वर्षांच्या मुलाच्या अपहरणाचा प्रयत्न, संशयिताला अटक
पिंपरी : आपल्या आई-वडिलांसोबत बँकेत आलेल्या अडीच वर्षांच्या मुलाला पळवून देण्याचा प्रयत्न करण्यात आला. ही घटना गुरूवारी (दि. १९) तळेगाव दाभाडे येथील बँक ऑफ महाराष्ट्राच्या गेटवर घडली. याप्रकरणी महिलेने तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी मनीषकुमार बिनोद दास (वय २७, रा. सुरसंड, सीतामढी, बिहार) याला अटक केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला या आपल्या पतीसह बँकेत कामानिमित्त जात होत्या. त्यांच्यासोबत त्यांचा अडीच वर्षांचा मुलगादेखील होता. त्याने चालताना फिर्यादी महिलेचा हात सोडला. त्यावेळी संशयित मुलाचा हात पकडून त्याला आपल्यासोबत घेऊन जात होता. मुलगा दिसून न आल्याने त्याच्या आई-वडिलांनी त्याचा शोध घेतला, तेव्हा तो संशयिताबरोबर जात असल्याचे दिसून आले. संशयिताला तत्काळ पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. संशयित हा मानसिक आजारी असावा. तो एकसारखा बडबड करत होता, अशी माहितीदेखील पोलिसांनी दिली.