अडीच हजार नागरिकांना दाखले - हेमंत निकम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2018 11:44 PM2018-09-30T23:44:54+5:302018-09-30T23:45:08+5:30

‘शासन आपल्या दारी’ उपक्रमाचा नागरिकांना होतोय फायदा

Two-and-a-half thousand citizens certificates - Hemant Nikam | अडीच हजार नागरिकांना दाखले - हेमंत निकम

अडीच हजार नागरिकांना दाखले - हेमंत निकम

Next

सुपे : महाराजस्व अभियानाच्या माध्यमातून ‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमाद्वारे नागरिकांना विविध स्वरूपाचे सुमारे २ हजार ८०० दाखले उपलब्ध करून दिले आहेत. तसेच, यातून कोणी वंचित राहणार नाही, याची खबरदारी घ्या. या अभियानाचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन बारामतीचे प्रांताधिकारी हेमंत निकम यांनी केले आहे.

बारामती तालुक्यातील सुपे येथे ८ गावांसाठी महसूल विभागाच्या वतीने महाराजस्व अभियानांतर्गत ‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रांताधिकारी निकम होते. या वेळी ते बोलत होते. यावेळी तहसीलदार हनुमंत पाटील, नायब तहसीलदार महादेव भोसले, पांढरगोटे, वीज वितरणचे अमित धोत्रे, वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल वाघमारे, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. काळभोर, मंडलाधिकारी राहुल जगताप, तलाठी दीपक साठे, आर. आर. जगदाळे, ग्रामविकास अधिकारी डी. जी. लोणकर, सरपंच स्वाती हिरवे, जिल्हा परिषद सदस्य भरत खैरे, पंचायत समिती सदस्या नीता बारवकर, दूध संघाचे संचालक अप्पासाहेब शेळके, बाजार समितीचे संचालक शौकत कोतवाल, पोपट खैरे, संपतराव जगताप, संजय दरेकर, बी. के. हिरवे, दंडवाडीच्या सरपंच मनीषा चांदगुडे, काळखैरेवाडीचे सरपंच विशाल भोंडवे, भोंडवेवाडीचे सरपंच कांतीलाल मेरगळ, कुतवळवाडीचे सरपंच शिवाजी सकट उपस्थित होते. प्रस्ताविक अनिल हिरवे यांनी केले. स्वागत ग्रामपंचायत सदस्यांनी केले. सूत्रसंचालन अशोक लोणकर यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अनिल हिरवे, सचिन पवार, भीमा वाघचौरे, राहुल तावरे आदींचे योगदान मिळाले.

‘शासन आपल्या दारी’ या शासनाच्या माध्यमातून नागरिकांना आधार कार्ड, जातीचे दाखले, शेतकऱ्यांना बी - बियाणे वाटप, मोफत गॅसकनेक्शन, उत्पन्नाचे दाखले, तसेच वीज वितरण, प्राथमिक आरोग्य केंद्र विभाग, कृषी विभाग, पशुसंवर्धन विभाग, एस. टी. परिवहन विभाग, ग्रामीण रुग्णालय सुपे तसेच ग्रामपंचायतीच्या वतीने ई - लर्निंगचे वाटप, आंगणवाडी टॅब वाटप, शहाजी विद्यालयातील क्रीडा स्पर्धेतील विद्यार्थ्यांना ड्रेस किटचे वाटप आदी सुमारे २ हजार ८०३ लाभार्थींना विविध दाखले व वस्तूंचे वाटप करण्यात आले आहे.

Web Title: Two-and-a-half thousand citizens certificates - Hemant Nikam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे