अडीच वर्षांत तब्बल पावणेआठशे गुंड तडीपार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2021 04:09 AM2021-09-13T04:09:48+5:302021-09-13T04:09:48+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : खून, खुनाचा प्रयत्न, खंडणी, मारामारी असे अनेक गुन्हे करून लोकांमध्ये दहशत पसरविणारे आणि पोलिसांची ...

In two and a half years, over eight hundred goons were deported | अडीच वर्षांत तब्बल पावणेआठशे गुंड तडीपार

अडीच वर्षांत तब्बल पावणेआठशे गुंड तडीपार

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : खून, खुनाचा प्रयत्न, खंडणी, मारामारी असे अनेक गुन्हे करून लोकांमध्ये दहशत पसरविणारे आणि पोलिसांची डोकेदुखी ठरणाऱ्या गुंडांवर आणि त्यांच्या टोळ्यांवर पोलीस उपायुक्तांकडून तडीपारीचा प्रस्ताव मंजूर केला जातो. पुणे शहरातून गेल्या अडीच वर्षांत तब्बल ७७८ गुंडांना तडीपार करण्यात आले आहे. त्यातील अनेक गुंड तडीपारीचा भंग करून पुन्हा शहरात येत असतात. यंदा गेल्या ८ महिन्यांत असे १५ तडीपार गुंड शहरात वास्तव्य करीत असल्याचे पोलिसांना आढळून आले होते. त्यांना अटक करण्यात आली आहे.

शहरात अनेक गुंडांच्या टोळ्या कार्यरत आहेत. या टोळ्यांमध्येही अनेकदा आपल्या एरियावरून भांडणे होत असतात. तसेच एकमेकांना खुन्नस दिल्यावरून अगदी खुनापर्यंत प्रकरणे गेली आहेत. शहराच्या झोपडपट्ट्यांमध्ये प्रामुख्याने हे गँगवॉर होत असते.

शहराच्या वेगवेगळ्या भागात गुंड आपल्या टोळ्या जमवून लोकांवर दहशत पसरवित असतात. त्यातून दुकानदारांना प्रोटेक्शन मनीच्या नावाखाली हप्तेवसुली केली जाते. कोणी हप्ते देण्यास नकार दिला तर त्याला भर रस्त्यात मारहाण करून इतरांवरही दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो. अशा गुंडांविरुद्ध तक्रार देण्यास नागरिक पुढे येत नाही. त्यामुळे त्यांची दहशत वाढल्याचे दिसून आल्यावर स्थानिक पोलीस ठाण्यातून त्यांचा तडीपारीचा प्रस्ताव मागविला जातो. असा प्रस्ताव आला की पोलीस उपायुक्त त्याची पडताळणी करून त्याला १ किंवा २ वर्षे तडीपार करण्यास मंजुरी देतात. त्यानंतर स्थानिक पोलीस संबंधित गुंडाला अटक करून जिल्ह्याबाहेर तो सांगेल, त्या ठिकाणी त्याला नेऊन सोडले जाते.

तडीपार केल्यानंतर काही गुंड तेथे राहतात. पण नेहमीची सवय जात नसल्याने ते पुन्हा लपून छपून शहरात येतात. अशा गुंडाची माहिती मिळाल्यावर पोलिसांकडून कारवाई केली जाते.

......

* २०१८ ते २०२० या दोन वर्षात एकूण ४६० तडीपारीचे आदेश काढण्यात आले होते. त्यात एकूण ६११ गुंडांना तडीपार करण्यात आले होते.

* या वर्षी १ जानेवारी ते १० सप्टेंबर २०२१ पर्यंत एकूण १०९ तडीपारीचे आदेश काढण्यात आले होते. त्यात १६७ गुंडांना तडीपार करण्यात आले आहे.

* तडीपार केले असतानाही तडीपारीचा भंग करून शहरात येऊन वास्तव करणाऱ्र्या अशा १५ गुंडांना यावर्षी पकडण्यात येऊन त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.

Web Title: In two and a half years, over eight hundred goons were deported

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.