मेडिकल दुकान फोडणाऱ्या तडीपार गुंडासह दोघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:19 AM2021-05-05T04:19:25+5:302021-05-05T04:19:25+5:30

पुणे : कोरोनामुळे मेडिकल दुकानांचा धंदा जास्त होत असल्याने तेथे जास्त घबाड मिळण्याची शक्यता गृहीत धरून दुकाने फोडणाऱ्या तडीपार ...

Two arrested along with Tadipar gangster who broke into a medical shop | मेडिकल दुकान फोडणाऱ्या तडीपार गुंडासह दोघांना अटक

मेडिकल दुकान फोडणाऱ्या तडीपार गुंडासह दोघांना अटक

Next

पुणे : कोरोनामुळे मेडिकल दुकानांचा धंदा जास्त होत असल्याने तेथे जास्त घबाड मिळण्याची शक्यता गृहीत धरून दुकाने फोडणाऱ्या तडीपार गुंडासह दोघांना कोंढवा पोलिसांनी अटक केली आहे.

तडीपार गुंड सूरज ऊर्फ पाप्या रमेश जाधव (वय २१, रा. काशेवाडी, भवानी पेठ) आणि त्याचा साथीदार रोहन सुभाष गायकवाड (वय २२, रा. काशेवाडी, भवानी पेठ) अशी अटक केलेल्याची नावे आहेत.

कोंढवा पोलीस ठाण्यातील तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर कापुरे यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली केली. कोंढव्यातील मेडिकलची दुकाने फोडण्यात तडीपार गुंड सूरज जाधव याचा हात आहे. त्यानुसार पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केल्यावर त्यांनी गुन्ह्यांची कबुली दिली.

सूरज जाधव हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून, त्याला खडक पोलिसांनी तडीपार केले आहे. असे असतानाही त्याने कोंढव्यातील दोन मेडिकल व एक फोटाेग्राफरचे दुकान फोडले होते. या तीन गुन्ह्यांतील चोरीस गेलेले १ लाख ३२ हजार ८०० रुपये व ७० हजार रुपयांचा कॅमेरा असा २ लाख २ हजार ८०० रुपयांचा माल हस्तगत केला आहे.

सध्या लॉकडाऊनमध्ये इतर दुकाने बंद आहेत. मात्र, मेडिकल दुकाने चालू आहेत. तसेच कोरोना महामारीमुळे मेडिकल दुकानाचा व्यवसायही चांगला चालला आहे. त्यामुळे तेथे अधिक पैसा मिळेल, म्हणून त्यांनी सेंट्रल लॉक नसलेल्या मेडिकलची दुकाने फोडून चोरी केल्याची कबुली दिली.

ही कामगिरी पोलीस उपायुक्त नम्रता पाटील, सहायक आयुक्त राजेंद्र गलांडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सरदार पाटील, पोलीस निरीक्षक शब्बीर सय्यद यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर कापुरे, अंमलदार रमेश गरुड, पृथ्वीराज पांडुळे, अभिजित रत्नपारखी, सुशील धिवार यांनी केली आहे.

Web Title: Two arrested along with Tadipar gangster who broke into a medical shop

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.