कमी किमतीत डॉलर देण्याच्या आमिषाने फसविणारे दोघे अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 04:12 AM2021-05-11T04:12:17+5:302021-05-11T04:12:17+5:30

आरोपी बांगलादेशी : विश्रांतवाडीतही चार लाखांची फसवणूक लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : कमी किमतीत डॉलर देण्याच्या बहाण्याने गंडा घालणाऱ्या ...

Two arrested for defrauding dollars | कमी किमतीत डॉलर देण्याच्या आमिषाने फसविणारे दोघे अटकेत

कमी किमतीत डॉलर देण्याच्या आमिषाने फसविणारे दोघे अटकेत

Next

आरोपी बांगलादेशी : विश्रांतवाडीतही चार लाखांची फसवणूक

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : कमी किमतीत डॉलर देण्याच्या बहाण्याने गंडा घालणाऱ्या टोळीतील दोघा बांगलादेशींना गुन्हे शाखेच्या पथकाने पकडले आहे.

पाखीबेगम अब्दुलमजीद खान (वय ३२) आणि महंमद शोएब अब्दुलमजीद खान (वय २७, रा. लक्ष्मीनगर, येरवडा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

काही महिन्यांपूर्वी दत्तवाडी परिसरातील एका रिक्षाचालकाशी ओळख करून त्यांना अमेरिकन डॉलर देतो, असे सांगून एक लाख रुपयांना दोघांनी गंडा घातला होता. या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखेच्या युनिट ३ कडून सुरू होता. या गुन्ह्यातील आरोपी हे हडपसर येथे येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार गुन्हे शाखेचे उपायुक्त श्रीनिवास घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक अनिल शेवाळे, उपनिरीक्षक दत्ता काळे यांच्या पथकाने सापळा रचून महिलेला व तिच्या साथीदाराला पकडले. त्यावेळी या टोळीने विश्रांतवाडी परिसरात अशाच पद्धतीने एकाला ४ लाख रुपयांचा गंडा घातल्याचे समोर आले आहे. हे दोन्ही आरोपी हे मूळचे बांगलादेशी असल्याचे तपासात समोर आले आहे. या आरोपींच्या साथीदाराचा शोध सुरू आहे.

Web Title: Two arrested for defrauding dollars

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.