जमीनीचे खोटे कागदपत्र करणाऱ्या दोघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 04:14 AM2021-04-30T04:14:25+5:302021-04-30T04:14:25+5:30
या प्रकरणी रोहिदास जाधव आणि विकास जाधव, (दोघे ही राहणार साईनाथ नगर, पिंपरी) या ...
या प्रकरणी रोहिदास जाधव आणि विकास जाधव, (दोघे ही राहणार साईनाथ नगर, पिंपरी) या दोघांवर गुन्हा नोंद करून त्यांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी राजेंद्र जाधव (रा. माळेगाव, ता. बारामती) यांनी पोलीसांना फिर्याद दिली आहे.
मसनेरवाडी (ता. दौंड) येथील जमीन गट नंबर ५६/ ३/ १अ या जमिनी संदर्भात रोहिदास जाधव याने दौंड येथील सब रजिस्ट्रार कार्यालयात दस्त नोंदणीच्या कागदपत्रात फेरफार केला, दरम्यान रोहिदास जाधव यांनी त्यांचा मुलगा विकास जाधव याच्याशी गुन्हेगारी संगणमत करुन माझ्या जमीनीच्या सातबारावरील नावे कमी करुन सातबाऱ्यावर त्यांची नावे लावून फसवणूक केली असल्याचे राजेंद्र जाधव यांनी फिर्यादीत म्हटले आहे.