अपहरण करून खंडणी मागणाऱ्या दोघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2021 04:16 AM2021-08-25T04:16:29+5:302021-08-25T04:16:29+5:30
राहुल राजाराम कान्हुरकर (वय २६) आणि अक्षय विनय खलाटे (२४, दोघे बहूळ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याबाबत पोलिसांनी ...
राहुल राजाराम कान्हुरकर (वय २६) आणि अक्षय विनय खलाटे (२४, दोघे बहूळ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सागर पुजारी यांचे चाकण औद्योगिक वसाहतीमधील एचपीसीएल कंपनीमध्ये कँटीन आहे. तेथे शिवाजी नरसू पाटील मॅनेजर म्हणून काम करतात. त्यांना एका अनोळखी इसमाने त्यांना फोन करून तुमच्याशी कँटीनच्या संदर्भात बोलायचे आहे, असे सांगून कंपनीच्या गेट बाहेर बोलावले. शिवाजी पाटील गेल्यानंतर, त्या दोघांनी इनोव्हा कारमध्ये (एमएच १४ जेपी ५६६६ ) त्यांना जबरदस्तीने बसविले. त्यानंतर कँटीन मालक सागर पुजारी यांना फोन केला आणि तुझा सर्व स्टाफ घेऊन निघून जायचे आणि कँटीन बंद करायची नाही तर गोळ्या घालीन, असे धमकावेल. कँटीन सुरू ठेवायचे असेल तर अगोरदरचा कँटीन चालक २५ हजार रुपये हप्ता देत होता. तूही दर महिन्याला पंचवीस हजार रुपये द्यायचे, असे सांगितले आणि शिवाजी पाटील यांना महाळुंगे येथे सोडून पळून गेले. त्याानंतर शिवाजी पाटील यांनी याबाबत पोलिसांना तक्रार केली. त्यानंतर पोलिसांच्या गुन्हे शाखेचे युनिट तीनच्या पथकाला गुप्त बतमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार चाकण येथील तळेगाव चौकात या गुन्ह्यातील आरोपी येणार असल्याने पोलिसांनी सापळा रचून दोघांना अटक केली. ही कामगिरी पोलीस निरीक्षक शंकर बाबर, उपनिरीक्षक गिरीश चामले, पोलीस शिपाई राजकुमार हनुमंते आदींनी कारवाई केली.