कोथरूड भागातील सराईताच्या खूनप्रकरणी दोघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2021 04:14 AM2021-02-09T04:14:00+5:302021-02-09T04:14:00+5:30
पुणे : सराईत गुंडाचा खून करून त्याचा मृतदेह बाह्यवळण महामार्गावरील डुक्कर खिंडीत टाकून फरार झालेल्या दोघांना गुन्हे शाखेच्या दरोडा ...
पुणे : सराईत गुंडाचा खून करून त्याचा मृतदेह बाह्यवळण महामार्गावरील डुक्कर खिंडीत टाकून फरार झालेल्या दोघांना गुन्हे शाखेच्या दरोडा विरोधी पथकाने अटक केली.
तेजस दत्तात्रय भालेराव (वय २१, रा. खेचरे, ता. मुळशी, जि. पुणे), महेश मलिक अहिवळे (वय २३, रा. जयप्रकाशनगर, किरकटवाडी, सिंहगड रस्ता) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. दोघेही रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. त्यांनी साथीदारांच्या मदतीने जगदीश पारघे या गुंडाचा खुन केला होता. तर जगदीश पारघे असे खून झालेल्या गुंडाचे नाव आहे.
बाह्यवळण मार्गावरील डुक्कर खिंडीत गेल्या महिन्यात जगदीश पारघे याच्यावर तीक्ष्ण शस्त्राने वार करून त्याचा खून करण्यात आल्याची घटना घडली होती. या गुन्ह्याचा तपास सुरू असताना भालेराव, अहिवळे कात्रज बाह्यवळण मार्गावर थांबल्याची माहिती पोलीस नाईक धनंजय ताजणे यांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून दोघांना पकडले. ही कामगिरी सहाय्यक पोलीस आयुक्त सुरेंद्रनाथ देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शिल्पा चव्हाण, शाहिद शेख, दिलीप जोशी, मॅगी जाधव, गणेश पाटोळे, यांच्या पथकाने केली.