बेकायदेशीर पिस्तुलाची विक्री करणाऱ्या दोघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2021 04:11 AM2021-05-10T04:11:19+5:302021-05-10T04:11:19+5:30

शिक्रापूर : शिक्रापूर-न्हावरा रस्त्यालगत गावठी पिस्तूल विक्रीसाठी आलेल्या दोघा युवकांना पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून गावठी पिस्तूल व जिवंत ...

Two arrested for selling illegal pistols | बेकायदेशीर पिस्तुलाची विक्री करणाऱ्या दोघांना अटक

बेकायदेशीर पिस्तुलाची विक्री करणाऱ्या दोघांना अटक

Next

शिक्रापूर : शिक्रापूर-न्हावरा रस्त्यालगत गावठी पिस्तूल विक्रीसाठी आलेल्या दोघा युवकांना पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून गावठी पिस्तूल व जिवंत काडतुसे जप्त करण्यात आले आहे.

स्वप्निल पोपट खटाटे (वय २२, रा. टाकळी हाजी, ता. शिरूर, जि. पुणे) व माणिक विलास मापारे (वय ३५, सध्या रा. शिक्रापूर, ता. शिरूर, जि. पुणे मूळ रा. टाकळी भीमा, ता. शिरूर, जि. पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आराेपींची नावे आहेत.

तळेगाव ढमढेरे येथील न्हावरा रस्त्यालगत एका ढाब्यासमोर दोन युवक गावठी पिस्तूल विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पोलिस निरीक्षक हेमंत शेडगे यांना मिळाली. त्यानंतर शिक्रापूर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक विक्रम साळुंखे, पोलिस उपनिरीक्षक राजेश माळी, अमोल खटावकर, नाईक योगेश नागरगोजे, श्रीमंत होनमाने, संतोष शिंदे, बापू हडागळे, शंकर साळुंके, हरिष शितोळे, संतोष पवार, भास्कर भास्कर, अमोल दांडगे, सचिन होळकर, लक्ष्मण शिरसकर यांनी तळेगाव ढमढेरे न्हावरा रस्त्यालगत असलेल्या न्यू अर्जुन ढाब्यासमोर जाऊन सापळा लावला होता. दोन संशयित युवक दुचाकीहून त्या ठिकाणी आल्याचे पोलिसांना दिसले. मात्र, पोलिसांची चाहूल लागताच दोघे युवक पळून जाऊ लागले. पोलिसांच्या पथकाने पाठलाग करत त्या दोघांना पकडले. त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे एक गावठी पिस्तूल व तीन जिवंत काडतुसे मिळून आली. दोघांना अटक करण्यात आली आहे.

फोटो.. शिक्रापूर पोलिसांनी दोघांना ताब्यात घेत गावठी पिस्तूल व तीन जिवंत काडतुसे हस्तगत केली. (धनंजय गावडे)

Web Title: Two arrested for selling illegal pistols

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.