दोन सख्खे भाऊ झाले पोलीस उपनिरीक्षक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2018 08:53 PM2018-06-22T20:53:57+5:302018-06-22T20:54:50+5:30

आई-वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी दोघा भावांनी हडपसर, पुणे येथे एकत्र राहून अभ्यास केला. अभ्यासात सातत्य ठेवल्याने संतोष याला पहिल्याच प्रयत्नात यश मिळाले.

two brothers became police sub-inspector | दोन सख्खे भाऊ झाले पोलीस उपनिरीक्षक

दोन सख्खे भाऊ झाले पोलीस उपनिरीक्षक

Next
ठळक मुद्देअभ्यासात सातत्य, जिद्द, चिकाटीच्या जोरावर परिस्थितीवर यशस्वीरीत्या मात करत यश

पाटेठाण : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षक परीक्षेत दौंड तालुक्यातील खामगाव (ता. दौंड) गाडमोडी येथील दत्तात्रय अनंता जाधव व संतोष अनंता जाधव या दोघा सख्ख्या भावांनी यश मिळवत समाजातील इतर युवक वर्गासमोर एक चांगला आदर्श निर्माण करुन दिला आहे.
खामगाव (ता.दौंड) गाडमोडी चौकानजीक हे भावंड आपल्या कुटुंबासह येथे राहतात. घरची परिस्थिती सामान्य स्वरुपाची आहे.  आपल्या मुलांनी उच्च शिक्षण घेऊन पोलीस उपनिरीक्षक व्हावे अशी आई-वडिलांची ईच्छा होती. जाधव बंधूंनी हेच स्वप्न उराशी बाळगून प्रामाणिक कष्ट करुन स्वप्न प्रत्यक्ष सत्त्यात उतरल्याने दत्तात्रय आणि संतोष यांच्या आई-वडिलांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले होते.
दत्तात्रय याने एमबीएचे शिक्षण पूर्ण केले. तर संतोषने कला शाखेतून पदवी घेतली आहे. दत्तात्रयने यापूवीर्ही महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली होती. त्यामध्ये त्याची महाराष्ट्र राज्य एसटी महामंडळामध्ये कामगार अधिकारी म्हणून निवड झाली होती. परंतू, एवढ्यावर समाधान न मानता आपल्या आई-वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी दोघा भावांनी हडपसर, पुणे येथे एकत्र राहून अभ्यास केला. अभ्यासात सातत्य ठेवल्याने संतोष याला पहिल्याच प्रयत्नात यश मिळाले. तर दत्तात्रय याने तिस-या प्रयत्नात यश मिळवून आपल्या आई-वडिलांचे स्वप्न पूर्ण केले. यशाबद्दल आमदार राहुल कुल यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला.
अभ्यासात सातत्य, जिद्द, चिकाटीच्या जोरावर परिस्थितीवर यशस्वीरीत्या मात करत यश मिळवले असून एवढ्यावर समाधान न मानता पुढे अभ्यास करुन डीवायएसपी किंवा तहसीलदार होण्याची ईच्छा असून केंद्रिय लोकसेवा, राज्यसेवा व इतर स्पर्धा परीक्षा हे साध्य नसून साधन असून स्पर्धा परीक्षांमध्ये यश प्राप्ती करायची असेल तर युवकांनी नियोजनपूर्ण अभ्यास, जिद्द, कठोर मेहनतीबरोबरच, धैर्य आवश्यक असल्याचे जाधव बंधूंनी सांगितले. पोलीस उपनिरीक्षकपदी यश संपादन केल्याने दोघा भावांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

Web Title: two brothers became police sub-inspector

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.