विजेच्या धक्क्याने दोन बैल जागीच ठार; जुन्नर तालुक्यातील बळीराजा आर्थिक संकटात

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2023 11:40 AM2023-07-30T11:40:51+5:302023-07-30T11:41:07+5:30

शेतकऱ्याला शासनाने व विज महामंडळाने तातडीने आर्थिक मदत करावी सरपंचांची मागणी

Two bulls were killed on the spot by lightning farmer of Junnar taluka in financial crisis | विजेच्या धक्क्याने दोन बैल जागीच ठार; जुन्नर तालुक्यातील बळीराजा आर्थिक संकटात

विजेच्या धक्क्याने दोन बैल जागीच ठार; जुन्नर तालुक्यातील बळीराजा आर्थिक संकटात

googlenewsNext

उदापूर : जुन्नर तालुक्याच्या उत्तरेकडील आदिवासी भागात पावसाचा जोर कायम असल्यामुळे भात लागवडीसाठी मशागतीची कामे चालू आहेत. भर पावसात शेतकरी आपल्या बैल जोडीसह शेतामध्ये काम करताना पाहायला मिळत आहे. शेतीच्या कडेला बैल जोडीला विश्रांतीसाठी बांधले असता अचानक खांबाला दिलेल्या ताणामध्ये करंट आल्याने आदिवासी शेतकऱ्याची दोन बैल जागीच ठार झाले असून शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.

मांडवे, पुताचीवाडी येथील भीमा विठ्ठल दाभाडे यांच्या शेतातील विदुत खांबाच्या ताणाला वीजप्रवाह आल्याने बैलाना विजेचा धक्का लागून दोन्ही बैल जागीच ठार झाले. सदर घटना समजताच विज महावितरण कंपनीचे आळेफाटा उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता संतोष तळपे, ओतूर शाखा अभियंते ऋषीकेश बनसोडे, कोपरे मांडवे फिडरचे वायरमन सचिन देठे तसेच पशुवैधकीय अधिकारी डॉ. सचिन राहणे व डॉ. सी. बी. पथवे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.
    
शेतकऱ्याला शासनाने व विज महामंडळाने तातडीने आर्थिक मदत करावी अशी मागणी सरपंचांनी केली आहे. नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांला तातडीने आर्थिक मदत न मिळाल्यास आंदोलनाचा इशारा यावेळी येथील आदिवासी ग्रामस्थांनी दिला आहे.

Web Title: Two bulls were killed on the spot by lightning farmer of Junnar taluka in financial crisis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.