Pune Crime: हडपसरमध्ये दोन घरफोड्या; पावणेचार लाखांचा ऐवज लंपास
By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2024 07:23 PM2024-04-03T19:23:06+5:302024-04-03T19:23:50+5:30
याप्रकरणी मंगळवारी (दि. २) हडपसर पोलिस ठाण्यात दोन तक्रारी देण्यात आल्या आहेत....
पुणे : राहते घर बंद असताना घराच्या दरवाजाची कडी तोडून लोखंडी कपाटात ठेवलेले दागिने आणि घरातील बांधकामाचे साहित्य चोरून नेल्याच्या दोन घटना समोर आल्या आहेत. याप्रकरणी मंगळवारी (दि. २) हडपसर पोलिस ठाण्यात दोन तक्रारी देण्यात आल्या आहेत.
पहिल्या घटनेत राजकन्या अभिजित कुठे (वय २५, रा. केशवनगर) यांनी हडपसर पोलिसांना फिर्याद दिली आहे. हा प्रकार २६ मार्च २०२४ रोजी संध्याकाळच्या सुमारास घडला. घराचे कुलूप ताेडून बेडरूममधील कपाटातील ३ लाख ३२ हजार रुपये किमतीचे १० तोळे सोन्याचे दागिने चोरून नेले. याप्रकरणी हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक उमेश रोकडे हे करत आहेत.
दुसऱ्या घटनेमध्ये, राहुल सर्जेराव शितोळे (वय ३२, रा. सासवड रोड) यांनी फिर्याद दिली आहे. १६ मार्च २०२४ रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घरात प्रवेश केला. घरामध्ये ठेवलेले घरबांधकामाचे साहित्य चोरून नेले आहे. याप्रकरणाचा पुढील तपास पोलिस हवालदार प्रशांत भोसले करत आहेत.