मावळ लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीतून दोघांची माघार, ३३ उमेदवार रिंगणात
By ज्ञानेश्वर भंडारे | Published: April 29, 2024 06:12 PM2024-04-29T18:12:51+5:302024-04-29T18:16:06+5:30
पिंपरी : उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी शुक्रवारी मावळ लोकसभा मतदारसंघातून दोन जणांनी आपले अर्ज मागे घेतले आहेत. ...
पिंपरी : उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी शुक्रवारी मावळ लोकसभा मतदारसंघातून दोन जणांनी आपले अर्ज मागे घेतले आहेत. त्यामुळे या मतदारसंघातील लढतीचे चित्र स्पष्ट झाले असून, ३३ उमेदवार रिंगणात असणार आहेत.
मावळ लोकसभा मतदारसंघातून ३८ उमेदवारांनी अर्ज भरले होते. त्यापैकी छाननीमध्ये तीन अपक्ष उमेदवारांचे अर्ज बाद झाले, तर ३५ उमेदवार पात्र ठरले होते. अर्ज माघारी घेण्याची सोमवारी अंतिम मुदत होती. त्यामध्ये दोन उमेदवारांनी माघार घेतली. त्यामुळे मावळ लोकसभा मतदारसंघाच्या रिंगणात ३३ उमेदवार राहिले आहेत. महाविकास आघाडीचे संजोग वाघेरे आणि महायुतीचे खासदार श्रीरंग बारणे यांच्यामध्ये खरी लढत होणार असल्याचे निश्चित झाले आहे.
अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी अपक्ष भाऊसाहेब आडागळे, धर्मपाल तंतरपाळे या दोन उमेदवारांनी सोमवारी निवडणूक रिंगणातून माघार घेतली. तर महाविकासआघाडी व महायुती दोन प्रमुख पक्षासह बहुजन समाज पार्टी, वंचित बहुजन आघाडी, बहुजन मुक्ती पार्टी यांच्यासह अपक्ष उमेदवार रिंगणात असणार आहेत,' अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी यांनी दीपक सिंगला यांनी दिली.