इंद्रायणीत बुडून दोन मुलांचा मृत्यू
By admin | Published: June 1, 2017 11:22 PM2017-06-01T23:22:29+5:302017-06-01T23:22:29+5:30
नातेवाईकांकडे सुट्टीसाठी आलेली दोन सतरा वर्षीय मुले देहूतील इंद्रायणी नदी पात्रात पोहण्यास गेले असता खोलीचा अंदाज न
Next
>ऑनलाइन लोकमत
पिंपरी-चिंचवड, दि. 1 - नातेवाईकांकडे सुट्टीसाठी आलेली दोन सतरा वर्षीय मुले देहूतील इंद्रायणी नदी पात्रात पोहण्यास गेले असता खोलीचा अंदाज न आल्याने बुडून मृत्यु झाल्याची घटना गुरुवारी सायं काळी साडेसहाच्या सुमारास घडली. योगेश शंकर जगताप ( वय १७,रा.शिंदगे,ता.कळंबनोरी,जि.हिंगोली ) आणि अनिरुध्द ज्ञानेश्वर देवतरसे (वय १७,रा.सदोबा सावळी,ता.आरणी,जि.यवतमाळ )असे इंद्रायणी नदीत बुडून मृत झालेल्या मुलांची नावे आहेत.
पोलिस नाईक बाबा सावंत यांच्याकडून मिळालेल्या माहीतीनुसार गुरुवारी सायंकाळी योगेश,अनिरुद्ध आणि त्याच्या सोबत चुलत भाऊ ( नाव पत्ता समजू शकले नाही ) असे तिघे देहूतील गाथा मंदीर जवळील इंद्रायणी नदी पात्रात मास्यांचा डोह असलेल्या ठिकाणी पोहण्यास गेले होते. तेथे नदीच्या खोलीचा अंदाज न आल्याने ते बुडाले. चुलत भावाने आरडाओरड केल्य।वर घटना स्थळी जमा झालेल्या ग्रामस्थांच्या मदतीने दोघांना काढण्यात आले. दोघांना पिंपरी येथील रुग्णालयात 3पचारार्थ दाखल करण्यापूर्वी मृत झाल्याचे डॉक्टरानी घोषित केले.याप्रकरणी रात्री उशीरापर्यत गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.