धक्कादायक! आईसह दोन मुलांना खून करून जाळले; चुलत दिराच्या कृत्याने पुणे हादरले

By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2023 07:42 AM2023-04-06T07:42:04+5:302023-04-06T08:06:11+5:30

कोंढवा पोलिसांनी याप्रकरणी आरोपीला अटक केली आहे. 

Two children, including their mother, were murdered and burned; incident in pune | धक्कादायक! आईसह दोन मुलांना खून करून जाळले; चुलत दिराच्या कृत्याने पुणे हादरले

धक्कादायक! आईसह दोन मुलांना खून करून जाळले; चुलत दिराच्या कृत्याने पुणे हादरले

googlenewsNext

- किरण शिंदे

पुणे: बुधवारी मध्यरात्री पुणे शहरातील कोंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत धक्कादायक प्रकार घडला. चुलत दिरानेच दोन चिमुकल्यासह त्यांच्या आईचा निर्घृण खून केला आणि त्यानंतर त्यांना घरात जाळून टाकले. चारित्र्याच्या संशयातून हा सर्व प्रकार घडला आहे. कोंढवा पोलिसांनी याप्रकरणी आरोपीला अटक केली आहे. 

आम्रपाली वाघमारे (वय 30) रोशनी (वय 6) आणि 4 अशी या घटनेत खून व जाळण्यात आलेल्यांची नावे आहेत. आरोपी दिर वैभव वाघमारे याला पोलिसांनी अटक केली आहे. मध्यरात्रीच्या सुमारास हा सर्व प्रकार घडला. याप्रकरणी अधिक माहिती अशी की, आरोपी वैभव आणि आम्रपाली हे मूळचे पुण्याबाहेरील शहरातील आहेत. आरोपी हा आम्रपाली हिचा चुलत दीर आहे. आम्रपाली ही विवाहित असतानाही या दोघातही प्रेमसंबंध होते. काही महिन्यांपूर्वी दोघेही पुणे शहरात पळून आले होते. कोंढवा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील पिसोळी येथे ते भाड्याच्या घरात राहत होते. दरम्यान आम्रपालीच्या चारित्र्यावर आरोपी संशय घ्यायचा. त्यातूनच ही संपूर्ण घटना घडल्याचे पोलिसांनी सांगितले. 

दरम्यान बुधवारी मध्यरात्री या दोघात वाद झाले. हा वाद विकोपाला गेल्याने वैभवने आम्रपाली हिला ठार मारले. हा सर्व प्रकार पाहून मुलं रडत असताना आरोपीने त्यांनाही मारले. त्यानंतर मृत अवस्थेत असणाऱ्या तिघांनाही त्याने घरातच जाळले. हा सर्व प्रकार झाल्यानंतर आरोपी पसार झाला होता. मात्र घटनेची माहिती मिळताच कोंढवा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पसार झालेले आरोपीचा शोध घेऊन त्याला अटक केली. कोंढवा पोलीस अधिक तपास करत आहेत.

Web Title: Two children, including their mother, were murdered and burned; incident in pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.