पोलिसांमुळे वाचले दोघा शाळकरी मुलींचे जीव
By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2019 01:48 AM2019-02-05T01:48:09+5:302019-02-05T01:49:32+5:30
दस्तूर शाळेत शिकणाऱ्या दोन मुली दुचाकीवरून जात असताना अचानक समोर वाहन आल्याने त्यांची दुचाकी घसरली आणि त्या दोघी खाली पडल्या.
पुणे -दस्तूर शाळेत शिकणाऱ्या दोन मुली दुचाकीवरून जात असताना अचानक समोर वाहन आल्याने त्यांची दुचाकी घसरली आणि त्या दोघी खाली पडल्या. त्यामुळे एकीला फिट आली़ त्याचवेळी पोलीस उपनिरीक्षक दिनेश पाटील तेथून कामावर जात होते़ त्यांनी परिस्थितीचे गांभीर्य पाहून तत्काळ येणाºया एका कारला थांबविले व त्या मुलींना त्यामधून थेट केईएम हॉस्पिटलमध्ये दाखल केले़ पोलीस उपनिरीक्षकामुळे त्या मुलीला लवकर उपचार मिळाल्याने ती सुखरुप आहे.
गुन्हे शाखेच्या युनिट एकमध्ये दिनेश पाटील उपनिरीक्षक म्हणून कार्यरत आहेत़ ही घटना सोमवारी सकाळी रेसकोर्सच्या गेटसमोर घडली़ वैष्णवी शर्मा व तन्वी ढोमे या दुचाकीवरुन जात असताना समोर वाहन आल्याने दुचाकीचे ब्रेक लागले़ त्यामुळे दुचाकी घसरुन दोघी खाली पडल्या़ त्यांना चांगलेच खरचटले होते़ त्यातील एका मुलीला फिट आली़ त्यामुळे रस्त्यातच तिच्या तोंडातून फेस येऊन लागला होता़ यावेळी पोलीस उपनिरीक्षक दिनेश पाटील यांनी तेथून जाणाºया जया रंगनानी (रा़ सोपानबाग, घोरपडी) यांना थांबवून त्यांच्या कारमधून दोघांना तसेच रवी मठपती याला सोबतीला बसवून ते स्वत: या कारच्या बरोबर थेट केईएम हॉस्पिटलमध्ये आले़ त्यांनी या अपघाताची मुलीच्या आईवडिलांना माहिती दिली़ तेही रुग्णालयात आले़ त्यांनी दिनेश पाटील यांचे आभार मानले.