Maval Incidence: तिहेरी हत्याकांडाने मावळ हादरले; आईच्या मृतदेहासह दोन चिमुरड्यांना जिवंतपणी फेकले नदीत

By नारायण बडगुजर | Published: July 22, 2024 04:42 PM2024-07-22T16:42:30+5:302024-07-22T16:44:34+5:30

विवाहितेचा मृतदेह नदीत फेकल्यावर आरडाओरडा करणाऱ्या तिच्या २ मुलांनाही जिवंतपणे नदीत फेकून दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय

Two children were thrown alive in the river along with the dead body of their mother in maval | Maval Incidence: तिहेरी हत्याकांडाने मावळ हादरले; आईच्या मृतदेहासह दोन चिमुरड्यांना जिवंतपणी फेकले नदीत

Maval Incidence: तिहेरी हत्याकांडाने मावळ हादरले; आईच्या मृतदेहासह दोन चिमुरड्यांना जिवंतपणी फेकले नदीत

पिंपरी : प्रेमसंबंधातून गरोदर राहिलेल्या विवाहितेचा गर्भपातादरम्यान मृत्यू झाला. तिचा मृतदेह नदीत फेकून दिला. त्यानंतर आरडाओरडा करणाऱ्या तिच्या दोन मुलांनाही जिवंतपणे नदीत फेकून दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मावळ तालुक्यातील या तिहेरी हत्याकांडाने खळबळ उडाली आहे.   

मावळ तालुक्यातील २५ वर्षीय विवाहित महिलेसह तिचा पाच वर्षीय मुलगा आणि दोन वर्षीय मुलगा यांची हत्या झाली. गजेंद्र जगन्नाथ दगडखैर (३७, रा. समता काॅलनी, वराळे, ता. मावळ), रविकांत भानुदास गायकवाड (४१, रा. सावेडी, ता. जि. अहमदनगर), गर्भपात करण्यासाठी मदत करणारी एजंट महिला, कळंबोली येथील हाॅस्पिटलमधील संबंधित डाॅक्टर व त्यांना मदत करणाऱ्या सर्वांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. 

पोलिस उपायुक्त बापू बांगर यांनी दिलेल्या माहितीनुसार, तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्यांतर्गत विवाहित महिला समरीन ही बेपत्ता असल्यावरून मिसिंग प्रकरण दाखल केले होते. या चौकशीमध्ये समरीन हिच्या प्रियकराने तिचा गर्भपात करण्याच्या निमित्ताने तिला आपल्या मित्रासोबत ठाणे येथे पाठविले होते. तेथे उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. त्यानंतर प्रियकराच्या मित्राने समरीन हिचा मृतदेह व तिच्या दोन्ही मुलांना परत घेऊन आला. तळेगाव एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये ९ जुलै २०२४ रोजी पहाटे प्रियकराच्या मदतीने समरीन हिचा मृतदेह इंद्रायणी नदीमध्ये टाकून दिली. हा प्रकार पाहून समरीन हिची दोन्ही मुले आरडाओरडा करून लागली. दोन्ही मुले रडू लागल्यामुळे त्यांना देखील जिवंतपणे नदीमध्ये टाकून दिले. याप्रकरणी तळेगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून प्रियकर गजेंद्र दगडखैर व त्याचा मित्र रविकांत गायकवाड यांना पोलिसांनी अटक केली.

Web Title: Two children were thrown alive in the river along with the dead body of their mother in maval

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.