इंदापर तालुक्यातील अभयवन कडबनवाडी वनक्षेत्रात दोन चिंकारा हरणांची गोळ्या झाडून शिकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2021 02:01 PM2021-09-19T14:01:53+5:302021-09-19T14:02:01+5:30

वनविभागाने पंचनामा केला असून येथील एका शेतकऱ्याने लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेरात वाहन दिसत असून तीन अज्ञात व्यक्तींवर वर गुन्हा दाखल करण्यात आला

Two chinkara deer were shot and killed in Abhayavan Kadbanwadi forest area of Indapar taluka | इंदापर तालुक्यातील अभयवन कडबनवाडी वनक्षेत्रात दोन चिंकारा हरणांची गोळ्या झाडून शिकार

इंदापर तालुक्यातील अभयवन कडबनवाडी वनक्षेत्रात दोन चिंकारा हरणांची गोळ्या झाडून शिकार

googlenewsNext

पुणे :  राज्यातील वनविभागाचा पथदर्शी प्रकल्प असलेल्या इंदापूर तालुक्यातील लोक अभयवन कडबनवाडी वनक्षेत्रात दोन चिंकारा हरणांची गोळ्या झाडून शिकार करण्यात आली आहे. त्यानंतर आरोपींनी हरणांना घेऊन पलायन केल्याचंही समोर आलं आहे. 

शनिवारी सकाळी सहा वाजता अलिशान चार चाकी गाडी भरधाव वेगानं आली. त्यांनी जवळ असलेल्या छऱ्याच्या बंदुकीतून गोळ्या झाडून चिंकारा हरणांची शिकार करत गाडीत घालून त्यांनी पलायन केलं.  

वनीकरणातील चारचाकी वाहनातून बंदुकीने चिंकारा हरणाला गोळी झाडण्यात आली. मोठा आवाज झाल्यानं वाहनाकडं पाहिले असता हरणाला गोळी झाडल्याचं दिसलं. त्यानंतर तिघांनी हरणास गाडीत घातले. असं एका शेतातील कामगारान सांगितल. 

या भागात चिंकारा हरणांची संख्या मोठी होती. मात्र गेल्या काही वर्षांपासून संख्या कमी होत आहे. याप्रकरणाचा छडा लावून  कारवाई करण्यात यावी अशी मागणी इंदापूर तालुका चिंकारा बचाव अभियानाचे प्रमुख भजनदास पवार यांनी केली आहे. आरोपींचा छ्डा न लागल्यास आंदोलन करणार असल्याचे नेचर क्लबचे ॲड सचिन राऊत यांनी सांगितले. दरम्यान या ठिकाणच्या वनविभागाने पंचनामा केला असून येथील एका शेतकऱ्याने लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेरात वाहन दिसत असून तीन अज्ञात व्यक्तींवर वर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Web Title: Two chinkara deer were shot and killed in Abhayavan Kadbanwadi forest area of Indapar taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.