जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर दोन कंटेनरचा अपघात
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2018 16:13 IST2018-01-15T16:13:16+5:302018-01-15T16:13:35+5:30
जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर सोमवार ( दि. १५ ) रोजी पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास दोन कंटेनरची धडक झाली.

जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर दोन कंटेनरचा अपघात
कामशेत - जुन्या मुंबई पुणे महामार्गावर कामशेत खिंडीच्या अलीकडे एका कंटेनरने दुसऱ्या कंटेनरला धडक दिल्याने सोमवारी पहाटे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. त्यामुळे या मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
जुना मुंबई-पुणे महामार्गावर कामशेत खिंडीच्या अलीकडे पुणे मुंबई लेनवर एका ढाब्याच्या समोर चढावर सोमवार ( दि. १५ ) रोजी पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास कंटेनर ( क्र. एमएच ४६ एच ७८०८ ) या लोड घेऊन जाणाऱ्या कंटेनर ला मागून येणाऱ्या कंटेनर ( क्र. एमएच १२ एफ झेड ३७१७ ) हा अतिवेगात असताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने मागून धडकला. यात अपघातग्रस्त कंटेनरचे मोठे नुकसान झाले असून या अपघातात कोणी जखमी नाही. मात्र या अपघातांमुळे दोन्ही वाहने महामार्गावर अडकल्याने वाहनांच्या सकाळी सकाळी लांबच लांब रांगा लागल्या होत्या. सकाळी सुमारे दहा वाजण्याच्या सुमारास कामशेत पोलिसांनी दोन्ही अपघातग्रस्त वाहने क्रेनच्या साहाय्याने महामार्गावरून बाजूला करून रस्ता वाहतुकीसाठी खुला केला.