गुंतवणुकीवर तिप्पट मोबदल्याच्या आमिषाने दोन कोटींचा गंडा; बावधन येथील बांधकाम व्यावसायिकाची फसवणूक

By नारायण बडगुजर | Updated: February 1, 2025 18:12 IST2025-02-01T18:11:36+5:302025-02-01T18:12:21+5:30

मुळशी तालुक्यातील म्हाळुंगे व बावधन येथे जानेवारी ते नाेव्हेंबर २०२२ या कालावधीत हा प्रकार घडला. 

Two crore rupees scammed with the promise of triple return on investment | गुंतवणुकीवर तिप्पट मोबदल्याच्या आमिषाने दोन कोटींचा गंडा; बावधन येथील बांधकाम व्यावसायिकाची फसवणूक

गुंतवणुकीवर तिप्पट मोबदल्याच्या आमिषाने दोन कोटींचा गंडा; बावधन येथील बांधकाम व्यावसायिकाची फसवणूक

पिंपरी : कंपनीत गुंतवणूक केल्यास तिप्पट मोबदला देतो, असे सांगून तरुणास दोन कोटी एक हजार रुपयांची गुंतवणूक करण्यास भाग पाडले. मात्र, कोणताही मोबदला न देता त्याची फसवणूक केली. मुळशी तालुक्यातील म्हाळुंगे व बावधन येथे जानेवारी ते नाेव्हेंबर २०२२ या कालावधीत हा प्रकार घडला. 

याप्रकरणी मुळशी तालुक्यातील बावधन बुद्रुक येथील ३७ वर्षीय व्यक्तीने शुक्रवारी (दि. ३१ जानेवारी) फिर्याद दिली. अनिष आचार्च, मनिष कुमार अगरवाल, पराग गर्ग, मुकुल जैन यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. भादंवि कलम ४२०, ४०६, महाराष्ट्र ठेवीदारांचे हितसंबधाचे रक्षण करणेबाबत अधिनियम १९९९ चे कलम ३, ४ अन्वये पोलिसांनी गुन्हा नोंद केला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा बांधकाम व शेती व्यवसाय आहे. संशयितांनी त्यांच्या प्रिविन प्रेपरेटिव्ह प्रा. लि. (पत्ता ए ६१, तिसरा मजला, सेक्टर ६५, नोएडा, गौतम बुद्ध नगर, उत्तरप्रदेश) या कंपनीत पैसे गुंतवणूक करण्यास सांगितले. दुप्पट-तिप्पट परताव्याचे आमिष दाखवून फिर्यादीचा विश्वास संपादन केला. त्यातून वेळोवेळी रोख, आरटीजीएस व आयएमपीएसव्दारे दोन कोटी एक हजार रुपये ठेव स्वरुपात घेऊन त्यांना गुंतवणूक करण्यास भाग पाडले. त्यासाठी तिप्पट मोबदला देतो, असे सांगितले. मात्र, फिर्यादीला कोणत्याही प्रकारचा परतावा किंवा गुंतवलेली रक्कम परत न देता विश्वासघात करून फसवणूक केली. पोलिस उपनिरीक्षक सागर ठाकरे तपास करीत आहेत.

Web Title: Two crore rupees scammed with the promise of triple return on investment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.