वेल्हेतील शिबिरात दोन दिवसांत ४० नोंदी निकाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2021 04:08 AM2021-07-04T04:08:03+5:302021-07-04T04:08:03+5:30
वेल्हे तालुक्यात सोमवार (ता.२८) व मंगळवार (ता.२९) रोजी विभागीय आयुक्त पुणे यांच्या आदेशानुसार व जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील चार ...
वेल्हे तालुक्यात सोमवार (ता.२८) व मंगळवार (ता.२९) रोजी विभागीय आयुक्त पुणे यांच्या आदेशानुसार व जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील चार मंडलामध्ये दोन दिवसीय शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिराचे उद्घाटन आडवली (ता. वेल्हे) येथील ज्ञानेश्वर मंगल कार्यालयात वेल्हेचे सभापती दिनकर सरपाले व जिल्हा परिषद सदस्य दिनकर धरपाळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शैलेश लोहाटे, उपजिल्हाधिकारी तथा अप्पर तहसीलदार, वेल्हे, तहसीलदार शिवाजी शिंदे, मंडला अधिकारी महेंद्र भोई, तलाठी रवींद्र बेंद्रे, दिनेश कपले आदी उपस्थित होते.
वेल्हे मंडलासाठी शिवगोरक्ष मंगल कार्यालय, पानशेत मंडळासाठी रानवडी येथील अनुशंकर मंगल कार्यालय, आंबवणे मंडलासाठी आडवली येथील ज्ञानेश्वर मंगल कार्यालय व विंझर मंडलासाठी न्यू इंग्लिश स्कूल विंझर या ठिकाणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या दोन दिवसांमध्ये सातबाऱ्यावर नोंदी घालण्यासाठी ४८ अर्ज तर सातबारामधील दुरुस्तीसाठी ४३ अर्ज प्राप्त झाले होते. यामध्ये दोन दिवसांत ४० नोंदी निकाली काढण्यात आल्याची माहिती तहसीलदार शिवाजी शिंदे यांनी दिली.
वेल्हे तालुका हा दुर्गम डोंगरी भाग असल्याने येथील या भागातील प्रमुख पीक भात शेती असल्याने सद्यस्थितीला शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणावर भात लावणीची कामे सुरू आहेत. तसेच या शिबिराची माहिती अपेक्षेप्रमाणे गावोगावी न पोहोचल्याने या शिबिराला अत्यल्प प्रतिसाद मिळाला शेतकऱ्यांची कामे उरकल्यानंतर पुन्हा एकदा या शिबिराचे आयोजन करण्यात यावे, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य अमोल नलावडे हे जिल्हाधिकारी यांच्याकडे करणार असल्याची माहिती दिली.