प्लॅस्टिकच्या बाटलीत तोंड अडकलेल्या कुत्र्याला 'अशा'प्रकारे मिळाले दोन दिवसांनंतर जीवदान

By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2020 08:07 PM2020-12-18T20:07:44+5:302020-12-18T20:08:31+5:30

प्लॅस्टिकच्या बाटलीत तोंड अडकलेल्या कुत्र्याची सुटका करुन त्याचा जीव वाचवण्यात पुणेकर दाम्पत्याला मिळाले यश..

Two days later, a dog stuck in a plastic bottle was rescued | प्लॅस्टिकच्या बाटलीत तोंड अडकलेल्या कुत्र्याला 'अशा'प्रकारे मिळाले दोन दिवसांनंतर जीवदान

प्लॅस्टिकच्या बाटलीत तोंड अडकलेल्या कुत्र्याला 'अशा'प्रकारे मिळाले दोन दिवसांनंतर जीवदान

Next
ठळक मुद्देपंडोल यांच्या दोन दिवसांच्या प्रयत्नाला यश, मुक्त होताच कुत्र्यानं ठोकली धूम.

पांडुरंग मरगजे-
पुणे : माणूस एखाद्या संकटात सापडला तर त्याला व्यक्त होता येते. पण एखादा मुका जीव अशा संकटात सापडला तर त्याची किती हाल होते याचा विचार न केलेलाच बरा आहे. पण या मुक्या जीवांच्या वेदना समजणारे काही व्यक्ती समाजात आहे. याचाच प्रत्यय देणारी घटना पुण्यात घडली. प्लॅस्टिकच्या बाटलीत तोंड अडकलेल्या कुत्र्याची सुटका करुन त्याचा जीव वाचवण्यात पुण्यातील पंडोल दापत्यांना अखेर यश मिळाले आहे. सुटका होताच सुटकेचा निश्वास टाकत कुत्र्याने धुम ठोकली.

पुण्यातील फिरोज पंडोल व प्रतिमा पंडोल दाम्पत्य कामानिमित्त सासवड ला गेले होते. दरम्यान सासवड बस स्थानका समोर बुधवारी रात्री एक कुत्र्याचे तोंड प्लॅस्टिक बाटलीत अडकले असल्याची माहिती फिरोज पंडोल यांना मिळाली. त्यानंतर त्यांनी लगेच घटनास्थळी धाव घेतली. स्थानिकांनी दिलेल्या माहितीच्या ठिकाणी पंडोल यांनी बराच शोध घेतला मात्र त्यांना कुत्रा काही सापडला नाही. हताश होत पंडोल यांना परत फिरावे लागले. दोन दिवस या घटनेचा विचार त्यांच्या मनात सुरू असतानाच शुक्रवारी (दि.१८) सकाळी सासवड बस स्थानकासमोर सदर कुत्रा असल्याची माहिती पंडोल यांना मिळाले. क्षणाचा हि विलंब न करता पंडोल यांनी घटनास्थळी धाव घेतली. बेदरलेल्या कुत्राला पकडण्याचे मोठं आव्हान पंडोल यांच्या समोर होते.

बुधवारी रात्री पासून शुक्रवारी सकाळी पर्यंत कुत्र्याचे तोंड त्या प्लॅस्टिक बाटलीत होते. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पंडोल यांनी चपळाईने कुत्र्यावर झेप घेत त्याला पकडले. अतिशय हुशारीने कटरच्या साह्याने प्लॅस्टिकची बाटली कापून कुत्र्याचे तोंड बाहेर काढले व सुखरुप त्याची सुखरूप सुटका केली.

दोन दिवसांच्या प्रयत्नांनंतर कुत्र्याची सुटका करण्यात पंडोल यांना यश मिळाले मात्र अजून काही वेळ घेला असता तर त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला असता. मुक्या प्राण्याचा जीव वाचवण्यासाठी घेतलेली मेहनत पाहून फिरोज पंडोल यांचं कौतुक होतं आहे. या कामगिरीमधे प्रतिमा पंडोल, निलेश मोरे, पवन गुप्ता, अक्षय दिवटे, संदीप निशाद व राकेश दास यांनी सहभाग घेतला होता.

Web Title: Two days later, a dog stuck in a plastic bottle was rescued

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.