भामा आसखेड धरणात बुडून दोन जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2022 08:38 PM2022-03-18T20:38:56+5:302022-03-18T20:40:00+5:30

पाण्यात बुडल्यावर शिवे गावातील लोकांनी धरणाकडे धाव घेतली...

two drowned in bhama askhed dam latest news in pune | भामा आसखेड धरणात बुडून दोन जणांचा मृत्यू

भामा आसखेड धरणात बुडून दोन जणांचा मृत्यू

googlenewsNext

पाईट  (पुणे) : बिरदवडी ( ता.खेड) येथील कुटुंबातील सदस्य सुट्टीचा आनंद घेण्यासाठी गेलेल्या युवकाचा युवतीसह भामा आसखेड धरणात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शुक्रवारी (दि.१८) दुपारच्या सुमारास घडली आहे. यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

रोहन रोकडे ( वय.२४ वर्षे, सध्या रा. बिरदवडी, मूळ रा. जुन्नर) आणि प्राजक्ता पवार ( वय.२० वर्षे, रा. बिरदवडी ) हे दोघे आपल्या कुटुंबासह धुलिवंदनच्या सुट्टीचा आनंद साजरा करण्यासाठी भामा आसखेड धरणावरील शिवे गावच्या हद्दीत फिरायला गेले होते. रोहन, प्राजक्ता यांच्यासह चोघे जण पोहण्यासाठी पाण्यात उतरले होते. पाण्याचा अंदाज आला नसल्याने रोहन, प्राजक्ता आणि एक महिला असे तिघे जण खोल पाण्यात बुडू लागले, मात्र पाण्यात उतरलेल्या चौघांपैकी बारा तेरा वर्षाच्या मुलाला पोहता येत असल्याने त्याने महिलेला बाहेर काढले मात्र रोहन आणि प्राजक्ता वयाने मोठे असल्याने त्यांना पाण्याबाहेर काढणे शक्य झाले नाही.

पाण्यात बुडल्यावर शिवे गावातील लोकांनी धरणाकडे धाव घेतली तोपर्यंत रोहन प्राजक्ता खोल पाण्यात बुडाले होते. स्थानिक रहिवाशांनी पाण्यात उतरून रोहनला शोधून पाण्याबाहेर काढले. तर वन्यजीव रक्षक संस्था मावळ, शिवदुर्ग मित्र लोणावळा येथील सदस्यांनी काही तासाच्या अथक परिश्रमानंतर धरणातून प्राजक्ताला शोधून काढण्यात यश मिळवले. भामा आसखेड धरणात बुडालेल्या युवक आणि युवतीच्या मृत्यूच्या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. भामा आसखेड धरणात बुडून मृत्यु झाल्याची दुःखद घटना पहिल्यांदाच घडली आहे.

Web Title: two drowned in bhama askhed dam latest news in pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.