केडगावला हृदयविकाराने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू
By Admin | Published: April 25, 2017 04:01 AM2017-04-25T04:01:53+5:302017-04-25T04:01:53+5:30
परिसरातील २ शेतकरी युवकांचा हृदयविकाराने मृत्यू झाला. त्यामुळे परिसरावर शोककळा पसरली आहे.पहिली घटना देशमुखमळा
केडगाव : (ता. दौंड) परिसरातील २ शेतकरी युवकांचा हृदयविकाराने मृत्यू झाला. त्यामुळे परिसरावर शोककळा पसरली आहे.
पहिली घटना देशमुखमळा येथील नवनाथ पोपट मोरे (वय ३0) यांचे शनिवार (दि.२२) रोजी शेतामध्ये झोपलेले असताना हृदयविकाराने निधन झाले. नवनाथ मोरे यांचा देशमुखमळा परिसरात गुऱ्हाळ व्यवसाय होता, तसेच या परिसरात मनमिळाऊ स्वभावमुळे नवा दाजी नावाने परिचित होते. त्यांच्या पाठीमागे आई, वडील, पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. सामाजिक कार्यकर्ते पोपट विष्णू मोरे यांचे पुत्र होत.
तर दुसऱ्या घटनेत गलांडवाडी (ता. दौंड) येथील शेतकरी युवक विठ्ठल रामचंद्र सोनवणे (वय ४0) यांचा हृदयविकाराने मृत्यू झाला. सोनवणे यांनी शुक्रवारी (दि. २१) सकाळी शेतामध्ये काम केले. त्यानंतर गावाच्या विकासकामांसाठी गावातील पदाधिकाऱ्यांसोबत पुणे येथे कामासाठी गेले होते. त्यानंतर सायंकाळी घरी आल्यावर म्हशीची धार काढताना अस्वस्थ वाटल्याने त्यांना केडगाव येथे खासगी दवाखान्यात दाखल केले. उपचार चालू असतानाच हृदयविकाराने त्यांचे निधन झाले. सोनवणे हे गलांडवाडी येथील हनुमान सोसायटीचे माजी अध्यक्ष व विद्यमान सदस्य होते.