वीज पडल्याने दोन मुलींचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2021 04:07 AM2021-05-03T04:07:19+5:302021-05-03T04:07:19+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नसरापूर : भोर तालुक्यातील नसरापुर-चेलाडी परिसरात रविवारी (दि २) दुपारी आलेल्या वादळी पावसासह वीज पडून दोन ...

Two girls die in lightning strike | वीज पडल्याने दोन मुलींचा मृत्यू

वीज पडल्याने दोन मुलींचा मृत्यू

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

नसरापूर : भोर तालुक्यातील नसरापुर-चेलाडी परिसरात रविवारी (दि २) दुपारी आलेल्या वादळी पावसासह वीज पडून दोन लहानग्या मुलींचा मृत्यू झाल्याची घटना घडली. तर एक मुलगी जखमी झाली. या दुर्दैवी घटनेमुळे या आदिवासी कातकरी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

सीमा अरुण हिलम (वय ११) व अनिता सिंकदर मोरे (वय ९, दोघी रा.चेलाडी, नसरापूर) असे वीज पडून मृत्यू झालेल्या मुलींची नावे आहेत. तर चांदणी प्रकाश जाधव (वय ९ ) ही मुलगी यातून सुदैवाने बचावली आहे. मात्र, ती जखमी झाली आहे. रविवारी दुपारी या तीन मुली घरापासून हाकेच्या अंतरावर डोंगरालगत खेळत होत्या. अचानक वादळी वाऱ्यासर पावसाला सुरूवात झाली. पावसात विजेचा कडकडाट झाला आणि एक वीज मुली खेळत असलेल्या ठिकाणी पडली. या घटनेत दोन मुली भाजून निघाल्या तर एक मुलगी बेशुद्ध झाली होती. यातूनही त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींनी तातडीने वेळ न घालवता नसरापूर येथील सिद्धीविनायक रुग्णालयात उपचारासाठी तिन्ही मुलींना दाखल केले. मात्र, सीमा व अनिता या दोन मुलींचा उपचारापूर्वीच मृतू झाल्याचे डॉ.जगदीश फराटे यांनी सांगितले.

यावेळी मंडलाधिकारी श्रीनिवास कंडेपल्ली, तलाठी जालिंदर बरकडे, पोलीस निरीक्षक विलास देशपांडे, सहायक पोलिस निरीक्षक मनोजकुमार नवसारे, उपनिरीक्षक राहुल साबळे व प्रमोद भोसले यांनी या दुर्दैवी घटनेची पहाणी करून पंचनामा केला आणि मृत झालेल्या मुलीच्या कुटुंबांना तातडीने शासकीय आर्थिक मदत कशी मिळेल यासाठी प्रयत्न सुरू केले तर माजी जि. प. सदस्य कुलदीप कोंडे, भोर पंचायत समितीचे उपसभापती लहू शेलार, नसरापूर ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ यांनी घटनास्थळाला भेट देऊन या कुटुंबांना दिलासा दिला.

सोबत फोटो व ओळ : नसरापूर चेलाडी येथे आज दुपारी आदिवासी वस्ती जवळील खडकालगत घटनास्थळाची पाहणी करताना अधिकारी.

Web Title: Two girls die in lightning strike

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.