बिबटयाच्या ह्ल्ल्यात दोन शेळ्या ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2020 04:11 AM2020-12-22T04:11:42+5:302020-12-22T04:11:42+5:30
ही घटना रात्री रविवारी मध्यरात्री अडीचच्या सुमारास घडली. याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहिती नुसार कुरकुंडी (ता. खेड) येथील झानेश्वर ...
ही घटना रात्री रविवारी मध्यरात्री अडीचच्या सुमारास घडली. याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहिती नुसार कुरकुंडी (ता. खेड) येथील झानेश्वर खंडु भोकसे यांच्या घराजवळील गोठ्यामध्ये बांधलेल्या शेळ्यांवर बिबट्याने हल्ला केला. त्यामध्ये शेळ्या जागीच ठार झाल्या. या बाबात तातडीने वनविभागास कळविल्यावर वनपाल सपकाळ, वनरक्षक राठोड शिपाई यानी तातडीने घटनास्थळास भेट देऊन पंचनामा केला बिबट्याचा वावर दिवसेंदिवस वाढत असल्याने परिसरात भितीचे वातावरण पसरले असुन वनविभागाच्या वतीने घराबाहेर पडताना खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. गेले दोन वर्षापासून आसखेड, शेलू, कुरकुंडी, कोरेगाव या गावांमध्ये बिबटयाचा वावर असून शेळ्या व इतर जनावरांवर वारंवार हा हल्ले होण्याच्या घटना घडत आहेत. या बाबात सरपंच सिमा राऊत व परिसरातील ग्रामस्थांनी बिबट्याला पकडण्यासाठीची उपाययोजना व पिजरा लावण्याची मागणी करण्यात आली आहे . ...............................................................