Pune: दोन गुंडांनी दहशत माजवली, पोलिसांनी वर्षभर जेल घडवली; ‘एमपीडीए’अंतर्गत कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2023 10:26 AM2023-07-06T10:26:52+5:302023-07-06T10:27:53+5:30

आतापर्यंत शहरातील २३ गुंडांविरूद्ध एमपीडीए कारवाई करण्यात आली...

Two goons wreak havoc, police set up jail for a year; Action under 'MPDA' | Pune: दोन गुंडांनी दहशत माजवली, पोलिसांनी वर्षभर जेल घडवली; ‘एमपीडीए’अंतर्गत कारवाई

Pune: दोन गुंडांनी दहशत माजवली, पोलिसांनी वर्षभर जेल घडवली; ‘एमपीडीए’अंतर्गत कारवाई

googlenewsNext

पुणे : शहरात दहशत माजविणाऱ्या दोन गुंडांविरूद्ध पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी झोपडपट्टीदादा प्रतिबंधक कायद्यान्वये (एमपीडीए) कारवाई करण्याचे आदेश दिले. गुंडांची रवानगी कारागृहात करण्यात आली असून, आतापर्यंत शहरातील २३ गुंडांविरूद्ध एमपीडीए कारवाई करण्यात आली आहे.

वनराज महेंद्र जाधव (वय २०, रा. लक्ष्मीनगर, येरवडा), महेश उर्फ दाद्या उर्फ रोहित कुंडलिक मोरे (वय २१, रा. वडगाव बुद्रुक) अशी कारवाई करण्यात आलेल्या गुंडांची नावे आहेत. महेश मोरे याला एक वर्षांसाठी अमरावती कारागृहात स्थानबद्ध करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. वनराज जाधवची रवानगी नागपूर कारागृहात करण्यात आली आहे. मोरेविरूद्ध खुनाचा प्रयत्न, शासकीय कर्मचाऱ्यावर हल्ला, बेकायदा शस्त्र बाळगणे, मारहाण करणे असे गंभीर स्वरूपाचे तीन गुन्हे दाखल आहेत. मोरेच्या दहशतीमुळे नागरिक पोलिसांकडे तक्रार करण्यास धजावत नव्हते. त्याच्यावर एमपीडीए कारवाई करण्याचा प्रस्ताव सिंहगड रस्ता पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अभय महाजन, गुन्हे प्रतिबंधक शाखेच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक वैशाली चांदगुडे यांनी तयार केला होता. या प्रस्तावास पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी मंजुरी दिली.

येरवडा भागातील लक्ष्मीनगर परिसरातील गुंड जाधवविरूद्ध खुनाचा प्रयत्न, शासकीय कर्मचाऱ्याला मारहाण, बेकायदा शस्त्र बाळगल्याप्रकरणी गुन्हे दाखल झाले आहेत. येरवडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक बाळकृष्ण कदम यांनी त्याच्यावर कारवाई करण्याचा प्रस्ताव तयार केला होता. या प्रस्तावाला पोलिस आयुक्तांनी मंजुरी देऊन त्याची रवानगी नागपूर कारागृहात करण्याचे आदेश दिले.

Web Title: Two goons wreak havoc, police set up jail for a year; Action under 'MPDA'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.