खेड तालुक्यातील वाशेरे येथे रेशन वाटपावरुन दोन गटांत तुंबळ हाणामारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2020 07:17 PM2020-04-21T19:17:17+5:302020-04-21T19:20:07+5:30
वाशेरे येथे रेशन दुकानदाराबाबत ग्रामस्थांच्या तक्रारी होत्या...
राजगुरुनगर: वाशेरे ( ता खेड ) येथे गावात दोन गटात रेशन वाटपावरून तुंबळ हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. कोयता, लोखंडी रॉड, दगडाने मारहाण करण्यात आली असुन त्यामध्ये चार जण गंभीर जखमी आहे. दुसऱ्या गटातील घरातील संसार उपयोगी साहित्याची, वाहनाची तोडफोड करण्यात आली आहे. ही घटना मंगळवारी ( दि. २१) सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास घडली आहे.
याबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वाशेरे येथे रेशन दुकानदाराबाबत ग्रामस्थांच्या तक्रारी होत्या. याबाबत खेड तहसिलदार यांनी गावात भेट देऊन तक्रारी दुर करण्याचा प्रयत्न केला होता. तसेच खेड पोलिस ठाण्यापर्यत हा वाद आला होता. तिथेही वाद मिटवण्यात आला होता. तसेच मंगळवारी (दि. २१ ) सकाळी वाशेरे येथे पोलीस येऊन ग्रामस्थांची बैठक घेऊन वाद मिटविणार होते. त्याचअगोदर सकाळी गावातील एका गटाने रेशन दुकांनावर जाऊन रेशन दुकानादार यांच्याशी बाचाबाची होऊन गटाने रेशन दुकांनावर हल्ला केला. दुकानातील रॉकेल डब्बे फेकुन दिले. तसेच ७ जणांना काठ्या कोयता, लोखडी गजांनी मारहाण केली. दरम्यान चिडून दुस?्या गटाने गावतील घरांवर हल्ला करून घरातील संसार उपयोगी वस्तू वितरत्र वस्तू फेकुन दिल्या. तसेच चारचाकी, गाड्याच्या काचा फोडल्या. या हल्ल्यात १२ जण जखमी झाले आहेत. त्यामधील ४ जण हाणामारीत गंभीर जखमी झाल्यामुळे पिंपरी चिंचवड येथील डी.वाय पाटील हॉस्पीस्टल दाखल करण्यात आले आहे. ८ जण चांडोली (ता खेड ) येथील ग्रामिण रुग्णालयात उपचार घेत आहे. खेड पोलिस ठाण्यात दोन्ही गटाच्या परपस्पर फिर्याद देण्याचे काम सुरू आहे. पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी गजानन टोम्पे करत आहे...