निवडणूक पार्श्वभूमीवर दोन गटांत भांडण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2021 04:09 AM2021-01-14T04:09:25+5:302021-01-14T04:09:25+5:30
या प्रकरणी शुभम तात्यासो काळभोर (वय २२, रा. बाजारमळा, लोणी काळभोर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुुुसार त्यांच्या परिवर्तन पॅनेलचे पाषाणकर ...
या प्रकरणी शुभम तात्यासो काळभोर (वय २२, रा. बाजारमळा, लोणी काळभोर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुुुसार त्यांच्या परिवर्तन पॅनेलचे पाषाणकर बाग, लोणी काळभोर येथे कार्यालय आहे. १२ जानेवारी रोजी रात्री ११-३० वाजण्याच्या सुमारास त्यांच्यासमवेत राजेश काळभोर, अमोल काळभोर, ऋषिकेश काळभोर, अजित काळभोर, अक्षय कामठे, रोहीत जवळकर हे जेवण-खान करून राहुल काळभोर हे पॅनेलचे ऑफिसमध्ये झोपण्यासाठी आले, त्यावेळी विरोधी अष्टविनायक पॅनेलचे प्रमुख शिवसेना हवेली तालुका प्रमुख प्रशांत दत्तात्रय काळभोर, राज उर्फ विशाल प्रताप काळभोर, गुरुदेव दत्तात्रय काळभोर, सौरभ दयानंद काळभोर, शुभम विलास काळभोर, निखिल धोंडीबा काळभोर, वैभव आनंदा काळभोर, रोहीत गिरी, नीलेश धोंडीबा काळभोर, शुभम प्रदीप क्षीरसागर व सिद्धेश्वर प्रदीप क्षीरसागर हे हातात लाकडी गज व लाकडी दांडके घेऊन तेथे आले व मारहाण करण्यास सुरुवात केली. तेव्हा ते तुम्ही येथे का थांबले, असे म्हणत होते. त्यांनी अविनाश चौधरी याची स्कॉर्पिओ क्रमांक एमएच १२ एसवाय ४९७०चे दरवाजावर व नंबर प्लेटवर मारून नुकसान केले. या भांडणात शुभम काळभोर यांची पाच तोळे वजनाची चैन तुटून पडून गहाळ झाली आहे.
अष्टविनायक पॅनलचे सौरभ दयानंद काळभोर (वय २३, रा.बाजारमळा, लोणी काळभोर ता हवेली) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार ते १२ जानेवारी रोजी रात्री ११-३० वाजण्याच्या सुमारास गाडी (क्रमांक एमएच १२ बीवाय ८४७४) मधून लोणी काळभोर गावातील पाषाणकर बाग गॅस एजन्सीचे समोरील रोडवर आले. त्यावेळी रोहीत जवळकर (रा.आळंदी म्होताबाची ता हवेली) व त्याच्यासोबत चार अनोळखी मुले होती. बाकीची चार मुले सोरतापवाडी येथील काळे रंगाची स्कॉर्पिओ (एम.एच.१२ एस वाय ४९७०) यामध्ये बसले होते, तेव्हा सौरभ याने रोहीत यांस तू इथे काय करतोय, असेे विचारले असता, तो तू खाली उतर तुला दाखवितो, असे म्हणाल्याने, सौरभ गाडीतून खाली उतरला असता, रोहीत व त्याच्यासोबत असलेल्या चार मुलांनी हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. तेवढ्यात तेथेे महाराष्ट्र केेसरी पैलवान राहुल रामचंद्र काळभोर हे आले व मारहण्यास सुरुवात केली. तेवढ्यात युवराज रामचंद्र काळभोर व रोहीत जवळकर यांनी दोघांनी त्याचे उजवे हातावर, खांद्यावर, पाठीवर लाकडी दांडक्याने मारहाण केली. त्यानंतर, योगेश रामचंद्र काळभोर, गणेश सुखदेव काळभोर, नितीन ज्ञानोबा काळभोर, आदित्य कुटे, किशोर मदने, सीताराम लांडगे, सुभाष काळभोर, प्रवीण राजाराम काळभोर, अमित माणिक काळभोर, शुभम तात्यासो काळभोर असे सर्वजण तेथे आले, शिवीगाळ करून मारू लागले व सफारी गाडीवर सर्वांनी बॅनरचे दांडके, बॅट, दगड व काठ्यांनी तोडफोड केली. त्यावेळी वरील सर्वजण शिवीगाळ करून ठार मारण्याची धमकी देत होते. भांडणामध्ये सौरभ याचे गळयामधील साडेसहा तोळ्याची सोन्याची चैन कोठेतरी पडून झाली आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूरज बंडगर - या प्रकरणाचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागले आहे. यामुळे भांडणे नेमकी कोणी सुरू केली, याचा तपास चालू आहे. रात्रीच्या प्रकरणामुळे पुढील दोन दिवस वातावरण चिघळू नये, यासाठी पोलिसांनी दोन्ही गटांच्या प्रचार सभांना परवानगी नाकारली आहे. गावात पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला असून, या पुढील काळात कायदा व सुव्यवस्था सुरळीत राखण्यासाठी गडबड करणाऱ्यावर गुन्हे दाखल करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.