दोनशे कोटी शिवदत्त नाम यज्ञकुंड पुजनाने दत्त जयंती सोहळ्यास सुरूवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2020 04:10 AM2020-12-29T04:10:26+5:302020-12-29T04:10:26+5:30
गराडे : दोनशे कोटी शिवदत्त नाम यज्ञकुंडाचे पुजनाने नारायणपूर येथील तिन दिवसीय दत्त जयंती सोहळ्यास सुरुवात रविवार पासून सुरूवात ...
गराडे : दोनशे कोटी शिवदत्त नाम यज्ञकुंडाचे पुजनाने नारायणपूर येथील तिन दिवसीय दत्त जयंती सोहळ्यास सुरुवात रविवार पासून सुरूवात झाली. मोजक्या गावकऱ्यांची उपस्थिती हिवरे येथून आजोळ ज्योत नारायणपुरला प्रस्थान
नारायणपूर येथे आणण्यात आली. सदगुरु नारायण महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व कार्यक्रम होणार आहे. यावर्षी कोराेनामुळे यात्रा साधेपणाने करण्याचे ठरले असून नारायणपूर येथे जमावबंदी लागू करण्यात आली आहे. नारायणपूरला येणारे रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत.
रविवारी सकाळी हिवरे (ता. पुरंदर) येथून नारायण महाराज यांच्या आजोळातून म्हणजे तात्या गायकवाड व सोपान गायकवाड यांच्या आजोळ घरातून ज्योत हिवरे ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहात पदयात्रेने हिवरे गावच्या वेशी जवळ आणली. याठिकाणी ''''दिगंबरा दिगंबरा'''' चा गजर करत गावकऱ्यांनी ज्योतीला शुभेच्छा देत ज्योतीचे नारायणपूरकडे दत्तजयंती सोहळ्यासाठी प्रस्थान झाले. जमावबंदी कायदा गावात लागु करण्यात असल्यामुळे ज्योतीचे पाच व्यक्तींच्या उपस्थित चारचाकी गाडीतून नारायणपुरकडे प्रस्थान ठेवले. यावेळी हिवरे गावचे माजी सरपंच एम. के. गायकवाड, शब्बीर शेख, पोलीस पाटील शंकर कुदळे, येवलेवाडीचे माजी सरपंच दादा कामठे, चंद्रकांत गायकवाड, शिवाजी गायकवाड, नारायण गायकवाड, ज्ञानेश्वर गायकवाड, उत्तम कुदळे, शांताराम दळवी, रमेश कुदळे, अमृत भांडवलकर आदी उपस्थित होते.
दोनशे कोटी शिवदत्त नाम यज्ञ अखंड प्रज्वलित अग्नि यज्ञकुंडाचे पुजन नारायण महाराज यांच्या हस्ते करण्यात आले. तर सासवड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अण्णासाहेब घोलप, एम. के. गायकवाड, रामदास मेमाणे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी मोजक्या गावकऱ्यांची उपस्थिती होती. यावेळी मध्यप्रदेशचे उद्योजक विरेन जैन, भरतनाना क्षिरसागर, प्रकाश बाफना, रामभाऊ बोरकर, मनोहर कोलते, श्रीनाथ बोरकर, अमृत भांडवलकर, अजित बोरकर, दादासाहेब भुजबळ, विशाल रासकर रोहित अभंग, डॉ. भास्कर कारकूड, भुजंग बोरकर, नितीन झेंडे, शिवाजी बोरकर, बाळासाहेब डांगे, मारुती बोरकर आदी उपस्थित होते.
दुपारी पालखीत पादुका ठेवून मंदिर प्रदक्षिणा झाल्यानंतर साध्या पद्धतीने वाजत पालखी यज्ञ कुंडाजवळ विसावली. २८ डिसेंबर रोजी दत्त मंदिरात दत्त जन्म सोहळा सायंकाळी ७ वाजून ०३ मिनिटांनी होणार आहे. तसेच दत्त जन्म प्रसंगी आरती, नाव ठेवणे, पाळणा, पुष्पवृष्टी, सुंठवडा वाटप व देव भेटविणे असे कार्यक्रम होणार आहेत.
फोटो : हिवरे (ता.) येथून दिगंबरा, दिगंबरा,श्रीपाद वल्लभ दिगंबरा च्या जयघोषात आजोळ ज्योतीचे नारयणपूरकडे प्रास्थान
२) नारायणपुर ( ता. पुरंदर ) येथे दोनशे कोटी शिवदत्त नाम यज्ञ होम-हवन प्रसंगी सदगुरु नारायण महाराज व इतर