मंचर बाजार समितीत दोनशे जणांची तपासणी,केवळ एक पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2021 04:10 AM2021-03-19T04:10:03+5:302021-03-19T04:10:03+5:30
मंचर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत संपूर्ण आंबेगाव तालुका, तसेच बाहेरच्या तालुक्यातूनही शेतकरी, व्यापारी मोठ्या प्रमाणावर येत असतात. या ...
मंचर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत संपूर्ण आंबेगाव तालुका, तसेच बाहेरच्या तालुक्यातूनही शेतकरी, व्यापारी मोठ्या प्रमाणावर येत असतात. या ठिकाणी कांदा-बटाटा, तसेच भाजीपाला खरेदी-विक्री करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असते. त्यामुळे साथीचा आजार पसरू नये, यासाठी आंबेगावच्या तहसीलदार रमा जोशी यांनी सर्वच व्यापाऱ्यांची कोरोना टेस्ट करण्यासाठी आवाहन केले होते. त्यानुसार बाजार समितीतील सर्व आडतदार, व्यापारी, हमाल, मापाडी, गाळेधारक व कर्मचारी यांची कोरोना ॲंटिजन टेस्ट करण्यात आली. कोरोना साथीचा आजार बाजार समितीत पसरू नये या दृष्टीने पावले उचलत बाजार समितीने प्राथमिक आरोग्य केंद्र महाळुंगे पडवळ यांच्या मदतीने परिसरातील 200 लोकांची आज तपासणी केली. आज केलेल्या कोरोना चाचणीसाठी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरेश ढेकळे, प्राथमिक आरोग्य केंद्र महाळुंगे पडवळचे डॉ. तुषार पवार, आरोग्य अधिकारी सोनिया गायकवाड,पर्यवेक्षक भास्कर साबळे,नितेश बोरसे,संदीप कदम, दत्तात्रय सोनवणे,पोपट गांजे,मच्छिंद्र शेगर, इंदुमती पोटे,अर्चना निंबाळकर, आशा थोरात,आशा वर्कर रूपाली बाणखेले ,सुरेखा गांजाळे यांच्या सहकार्याने 200 लोकांची कोरोणा चाचणी करण्यात आली.
आज केलेल्या तपासणीमध्ये केवळ एक व्यक्ती पॉझिटिव्ह सापडला आहे.