सहायक पोलीस निरीक्षकासह दोघांना पाच दिवसांची पोलीस कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2021 04:16 AM2021-09-10T04:16:41+5:302021-09-10T04:16:41+5:30

पुणे; जमीन-खरेदी विक्रीच्या व्यवहारात फसवणूक झाल्याच्या गुन्ह्यात जामिनाला विरोध न करण्यासाठी आणि अनुकूल अभिप्रायासाठी एकाकडून पाच लाखांची लाच ...

Two, including an assistant police inspector, were remanded in police custody for five days | सहायक पोलीस निरीक्षकासह दोघांना पाच दिवसांची पोलीस कोठडी

सहायक पोलीस निरीक्षकासह दोघांना पाच दिवसांची पोलीस कोठडी

Next

पुणे; जमीन-खरेदी विक्रीच्या व्यवहारात फसवणूक झाल्याच्या गुन्ह्यात जामिनाला विरोध न करण्यासाठी आणि अनुकूल अभिप्रायासाठी एकाकडून पाच लाखांची लाच मागणाऱ्या विमानतळ पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षकासह दोघांना न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने एक लाख रुपयांची लाच स्वीकारताना (एसीबी) बुधवारी (दि. ८) ही कारवाई केली. सहायक पोलीस निरीक्षक राहुल अशोक पाटील (वय ३२, रा. वडगाव शिंदे रस्ता) आणि संतोष भाऊराव खांदवे (वय ४६, रा. लोहगाव) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत एकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदविली होती. तक्रारदार यांच्या वडिलांचा जमीन -खरेदी विक्रीच्या व्यावसायिक कारणातून त्यांच्या वडिलांविरोधात विमानतळ पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्यात तक्रारदारांच्या वडिलांना अटक झाली असून ते पोलीस कोठडीत आहेत. या प्रकरणात जामीन मिळावा, यासाठी तक्रारदार यांनी पाटील यांच्याशी संपर्क केला होता. त्यांनी तक्रारदाराकडे पाच लाखांची लाच मागितली होती. तडजोडीत तक्रारदाराने तीन लाखांची लाच देण्याचे मान्य केले. लाचेचा पहिला हप्ता म्हणून एक लाखांची मागणी करण्यात आली होती. पाटील यांनी त्यांचा ओळखीचे खांदवे याला तक्रारदाराकडून लाच घेण्यासाठी बुधवारी लोहगाव परिसरात पाठविले. त्यावेळी विभागाने सापळा लावून खांदवेला एक लाखांची लाच घेताना पकडले. दोघांना गुरुवारी न्यायालयात हजर करण्यात आले होते. खांदवे याने रक्कम कोणाकोणासाठी घेतली होती? या गुन्ह्यात आणखी कोणाचा सहभाग आहे का? तपासात दोघेही सहकार्य करीत नसल्याने त्यांना विश्वासात घेऊन तपास करायचा आहे. त्यामुळे त्यांना पोलीस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकिलांनी केली होती. विभागाचे पोलिस निरीक्षक सुनील क्षीरसागर या गुन्ह्याचा तपास करीत आहेत.

Web Title: Two, including an assistant police inspector, were remanded in police custody for five days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.