जुन्नरमध्ये दोन किलो चांदी आणि १ लाख ७५ हजार रुपयांची चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2018 21:03 IST2018-08-27T21:02:56+5:302018-08-27T21:03:27+5:30
एका सराफ व्यावसायिकाच्या बंगल्यातुन अज्ञात चोरट्यानी दोन किलो चांदी, तसेच एक लाख ७५ हजार रुपये रकमेची चोरी केली.

जुन्नरमध्ये दोन किलो चांदी आणि १ लाख ७५ हजार रुपयांची चोरी
जुन्नर : येथील बोडकेनगर मधील जिजामाता सोसायटीत एका सराफ व्यावसायिकाच्या बंगल्याच्या दरवाजाचे कोयंडा तोडुन अज्ञात चोरट्यानी दोन किलो चांदी, तसेच एक लाख ७५ हजार रुपये रकमेची चोरी केली. याबाबत सराफ व्यावसायिक यशवंत नारायण मंचारकर यांनी जुन्नर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यशवंत मंचारकर हे देवदर्शनासाठी दोन दिवस परगावी गेले असल्याने चोरट्यानी डाव साधला. गावावरुन दोन दिवसांनी परतल्यावर मंचारकर यांना चोरी झाल्याचे निदर्शनास आले. चोरट्यानी बंद घर व बेडरूमचा दरवाजाचा कोयंडा तोडून कपाटातुन तसेच १ लाख ७५ हजार रुपये रोख रक्कमेची चोरी झाली. घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी दीपाली खन्ना, पोलीस निरीक्षक यशवंत नलावडे यांनी भेट देऊन पाहणी केली.