खळदजवळ अपघातात २ ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2018 02:38 AM2018-05-10T02:38:34+5:302018-05-10T02:38:34+5:30

जेजूरीहून देवदर्शन करून मुंबईकडे परतणाऱ्या भाविकांची लक्झरी बस व हडपसरहून जेजूरी कडे जाणा-या कारचा अपघात होवून कारमधील दोन जण ठार झाले. यामध्ये कार चालकाचा समावेश आहे. हडपसर-जेजुरी पालखी मार्गावर कायम अपघाती जागा असणा-या ठिकाणी हा अपघात झाला.

 Two killed in an accident near Khaled | खळदजवळ अपघातात २ ठार

खळदजवळ अपघातात २ ठार

Next

सासवड - जेजूरीहून देवदर्शन करून मुंबईकडे परतणाऱ्या भाविकांची लक्झरी बस व हडपसरहून जेजूरी कडे जाणा-या कारचा अपघात होवून कारमधील दोन जण ठार झाले. यामध्ये कार चालकाचा समावेश आहे. हडपसर-जेजुरी पालखी मार्गावर कायम अपघाती जागा असणा-या ठिकाणी हा अपघात झाला.
विजय शिवाजी कांबळे (ंवय ४०, रा उजळंब (लातूर) असे नाव असून दुस-या मृतदेहाची ओळख पटविण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते. कारमध्ये तीन व्यक्ती असल्याचे समजते. लग्न सराई व जेजूरीला खंडेरायाच्या दर्शनासाठी येणारे नवदांपत्यांचे यावेळी वाहतूक रखडल्यामुळे मोठ्या प्रमाणावर हाल झाले. सासवड पोलिसांनी त्वरीत हालचाली करून वाहतूक सुरळीत केली.
लक्झरी चालक बैचेन निसाद (मुंबई) यास पोलिसांनी अधिक तपासासाठी ताब्यात घेतले आहे. त्याच्यावर मोटार वाहन कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याचे काम चालू असल्याचे पोलीस निरिक्षक क्रांती कुमार पाटील यांनी सांगीतले.
मदत करणा-यांनाच मारहाण
या घटनेत खळद येथील ग्रामस्थांनी जखमींना रुग्णालयात नेण्यासाठी मदत केली. याच वेळी लक्झरीमधील काही युवकांनी गैरसमजातून जखमींना मदत करणा-या ग्रामस्थांना मारहाण केली. लक्झरीमध्ये महिला भाविक असल्याने ग्रामस्थ त्या युवकांना समजावत होते. या युवकांनी मद्य प्राशन केल्याने कोणाचेही ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते. या मारहाणीनंतर जखमींना मदत करायची कशी, असा संतप्त सवाल ग्रामस्थांनी केला. यानंतर संतप्त ग्रामस्थांनी दोन युवकांविरुद्ध सासवड पोलीस ठाण्यात तक्रार दिली त्यावरून फिर्याद नोंदविण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होते.

Web Title:  Two killed in an accident near Khaled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.