बसच्या धडकेत दोन ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2021 04:09 AM2021-06-28T04:09:33+5:302021-06-28T04:09:33+5:30

लाेकमत न्यूज नेटवर्क शिक्रापूर : पुणे-नगर महामार्गावरून कोंढापुरीजवळ रविवरी (दि. २७) सकाळी १०.३०च्या सुमारास भरधाव वेगाने आलेल्या ...

Two killed in bus crash | बसच्या धडकेत दोन ठार

बसच्या धडकेत दोन ठार

Next

लाेकमत न्यूज नेटवर्क

शिक्रापूर : पुणे-नगर महामार्गावरून कोंढापुरीजवळ रविवरी (दि. २७) सकाळी १०.३०च्या सुमारास भरधाव वेगाने आलेल्या बसचालकाचा बसवरील ताबा सुटल्याने झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला.

या घटनेत कोंढापुरीचे माजी सरपंच शामराव दगडू लोखंडे, रामचंद्र बुवाजी वाघमोडे दोघे (रा. कोंढापुरी, ता. शिरूर) या दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर, कुंडलिक गायकवाड, मंगलसिंग पवार (रा. कोंढापुरी, ता. शिरूर, जि. पुणे) तसेच बसचालक अशोक सुदाम मते (वय २३, रा. ईकोग्रम सोसायटी, शिक्रापूर, ता. शिरूर) हे तिघे जखमी झाले आहे. जखमींपैकी दोघांची प्रकृती गंभीर आहे.

कोंढापुरी (ता. शिरूर) येथील पुणे-नगर महामार्गावरून जेबील कंपनीच्या कामगारांना सोडणारी बस घेऊन चालक अशोक मते हे जात होते. मात्र, त्यांचा बसवरील ताबा सुटल्याने अचानकपणे रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या दुचाकीला धडकून देऊन बस पुढे एका मंदिराला धडकली. बस वेगात असल्याने शेजारील काही दुचाक्या व एका सायकलला चिरडून बस समोरील मोठ्या दगडाला धडकली. येथील काही दुकानांना धडकत गाडीखाली दगड आल्याने बस थांबली. या घटनेत कोंढापुरीचे माजी सरपंच शामराव दगडू लोखंडे, रामचंद्र बुवाजी वाघमोडे, कुंडलिक गायकवाड, मंगलसिंग पवार जखमी झाले. शामराव दगडू लोखंडे, रामचंद्र बुवाजी वाघमोडे यांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. तर दोघांची प्रकृती गंभीर आहे.

फोटो : अपघातग्रस्त बस

Web Title: Two killed in bus crash

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.