Pune | पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर टेम्पोच्या धडकेत दोघांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2023 15:45 IST2023-02-17T15:40:07+5:302023-02-17T15:45:02+5:30
हा अपघात चौफुला (ता. दौंड) जवळ गुरुवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडला...

Pune | पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर टेम्पोच्या धडकेत दोघांचा मृत्यू
यवत (पुणे) : पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर टेम्पोने दुचाकीला दिलेल्या धडकेत दुचाकीस्वारासह एकाचा मृत्यू झाला. हा अपघात चौफुला (ता. दौंड) जवळ गुरुवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडला. गिरीधारीलाल शिवकरण शर्मा (वय ४७) व कस्तुरचंद कन्हैयालाल शर्मा (६५, दोघे रा. नागपूर) अशी मृतांची नावे आहेत.
गिरीधारीलाल शर्मा आणि कस्तुरचंद शर्मा हे दोघे कामानिमित्त नागपूरहून चौफुला येथे आले होते. गुरुवारी चौफुला जवळ हे दोघे दुचाकीवरून रस्ता ओलांडत असताना केडगावच्या दिशेेने येणाऱ्या तेल वाहतूक करणाऱ्या टेम्पोने दुचाकीला धडक दिली. टेेम्पोने दुचाकी १०० मीटरपर्यंत फरफटत नेली. यामध्ये दोघांचा मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच यवत पोलिस व बारामती फाटा वाहतूक पोलिस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.