Pune | ओतूर- ब्राम्हणवाडा रस्त्यावरील भीषण अपघातात दोघांचा मृत्यू; एक जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2023 12:10 IST2023-05-17T12:09:44+5:302023-05-17T12:10:01+5:30
ओतूर ( पुणे ) : जुन्नर तालुक्याच्या उत्तर भागातील महत्त्वाचा जिल्हा मार्ग ओतूर- ब्राम्हणवाडा रस्त्यावर सोमवारी (दि. १५) दुपारी ...

Pune | ओतूर- ब्राम्हणवाडा रस्त्यावरील भीषण अपघातात दोघांचा मृत्यू; एक जखमी
ओतूर (पुणे) : जुन्नर तालुक्याच्या उत्तर भागातील महत्त्वाचा जिल्हा मार्ग ओतूर- ब्राम्हणवाडा रस्त्यावर सोमवारी (दि. १५) दुपारी एकच्या सुमारास ओतूरवरून ब्राम्हणवाडा गावच्या दिशेने जात असताना मोटरसायकल स्लीप होऊन कारवर जाऊन अपघात झाला. या अपघातात दोघांचा मृत्यू तर एक जण जखमी झाला आहे.
यावेळी संजय रखमा भागरे (वय २४, रा. कबटवाडी साखीरवाडी, ता. अकोले, जि. अहमदनगर) तर धनराज सुनील भागरे (वय २२, रा. कोहणे, ता. अकोले, जि. अहमदनगर) यांचा मृत्यू झाला आहे. तर कृष्णा काशिनाथ गोडे (रा. केळी कोतूळ, ता. अकोले, जि. अहमदनगर) हा जखमी झाला आहे. त्याच्यावर आळेफाटा येथे उपचार सुरू आहेत.