पुणे : मुंबई-बंगळुरू महामार्गावरील भीषण अपघातात दोघांचा मृत्यू; ट्रकचालक अटकेत

By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2022 07:32 AM2022-02-26T07:32:15+5:302022-02-26T07:46:22+5:30

भरधाव ट्रकने दुचाकीला पाठीमागून धडक दिली...

two killed in road mumbai bangalore highway in pune truck driver arrested | पुणे : मुंबई-बंगळुरू महामार्गावरील भीषण अपघातात दोघांचा मृत्यू; ट्रकचालक अटकेत

पुणे : मुंबई-बंगळुरू महामार्गावरील भीषण अपघातात दोघांचा मृत्यू; ट्रकचालक अटकेत

googlenewsNext

पुणे : मृत्यूचा सापळा बनलेल्या मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर झालेल्या अपघातात दोघांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. भरधाव वेगाने निघालेल्या ट्रकने दुचाकीला धडक दिली आहे. पाठीमागून दिलेल्या धडकेत दुचाकीस्वारासह सहप्रवासी महिला मृत्यूमुखी पडल्याची घटना घडली. याप्रकरणी सिंहगड पोलिसांनी ट्रकचालकाला अटक केली आहे.

सदाशिव चनबा सैय्या रायचुरकर करत होते. (वय ५०, रा. बाणेर) आणि प्रियंका मोहन सुखदेवे (वय २९, रा. ताथवडे) अशी मृत्यूमुखी पडलेल्यांचे नावे आहेत. याप्रकरणी ट्रकचालक संतोष वसंत बागडी (वय ३९, रा. कुमठे, जि. सातारा) याला अटक करण्यात आली आहे.

पोलीस नाईक अनिल हिंगणे यांनी यासंदर्भात सिंहगड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. रायचुरकर आणि सुखदेवे हे एका खासगी सुरक्षारक्षक कंपनीत सुरक्षारक्षक म्हणून काम करत होते. 

गुरुवारी (२४ फेब्रुवारी) दुपारी पावणेदोनच्या सुमारास दुचाकीस्वार रायचुरकर आणि सुखदेवे कात्रजकडे निघाले होते. बाह्यवळण मार्गावर नन्हे भागात तक्षशीला सोसायटीसमोर भरधाव ट्रकने त्यांच्या दुचाकीला पाठीमागून धडक दिली. या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली.

दरम्यान, अपघातात गंभीर जखमी झालेल्या दोघांचा उपचारांपूर्वीच मृत्यू झाला होता. सहाय्यक पोलीस निरीक्षक पी. बी. कणसे अधिक तपास करत आहेत.
 

Web Title: two killed in road mumbai bangalore highway in pune truck driver arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.