ओझर येथे उसाच्या शेतात आढळले बिबट्याचे दोन बछडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2021 04:09 AM2021-03-19T04:09:52+5:302021-03-19T04:09:52+5:30

ओझर येथील मांडे मळ्यात विलास सोनू कवडे यांच्या उसाच्या शेतात आज गुरुवारी सकाळी ऊसतोड चालू होती.ऊसतोड चालू असताना बिबट्याचे ...

Two leopard cubs found in a sugarcane field at Ozark | ओझर येथे उसाच्या शेतात आढळले बिबट्याचे दोन बछडे

ओझर येथे उसाच्या शेतात आढळले बिबट्याचे दोन बछडे

Next

ओझर येथील मांडे मळ्यात विलास सोनू कवडे यांच्या उसाच्या शेतात आज गुरुवारी सकाळी ऊसतोड चालू होती.ऊसतोड चालू असताना बिबट्याचे दोन बछडे ऊसतोड करणाऱ्या कामगारांना आढळून आल्याने परिसरात भीती निर्माण झाली.स्थानिक शेतकऱ्यांनी तत्काळ वनविभागाच्या अधिकाऱ्यांना याबाबत माहिती कळवली. नारायणगाव वनपरिमंडल अधिकारी मनीषा काळे व वनरक्षक कल्याणी पोटवडे यांनी घटनास्थळी भेट दिली आणि दोन्हीही बछड्यांना कॅरेट मध्ये ठेऊन माणिकडोह येथील बिबट निवारा केंद्रात उपचारांसाठी सुरक्षित हलविले.

दोन्हीही बछडे नर जातीचे असून सुमारे एक महिना वयाचे आहेत.आज (गुरुवारी) सायंकाळी पुन्हा या बछड्यांना ऊसतोड झालेल्या उसाच्या शेतात पुन्हा त्याच ठिकाणी ठेवून त्यांच्या आईच्या कुशीत देणार असल्याचे नारायणगाव वनपरिमंडल अधिकारी मनीषा काळे यांनी सांगितले. .

================================

"सध्या ऊसतोड सुरू आहे, त्यामुळे बिबट्यांची लपण कमी झाल्याने ते आता मानवी वस्त्यांमध्ये येऊ लागले आहेत.नागरिकांनी लहान मुलांची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे,त्यांच्यावर अधिक लक्ष ठेवणे गरजेचे आहे. बिबट्या दिसल्यास त्याचे फोटो किंवा शूटिंग करण्याचा प्रयत्न करू नये तसेच फोटो व शूटिंगसाठी त्याचा पाठलागही करू नये. आपल्या तालुक्यात बिबट्या आता कॉमन झालाय. फोटो व शूटिंगच्या हव्यासापायी आपल्या जिवाला धोका निर्माण होऊ शकतो. शेतकऱ्यांनी शेतात जाताना एकटे न जाता हातात काठी व बॅटरी ठेवावी."

-

.मनीषा जितेंद्र काळे,

वनपरिमंडल अधिकारी, नारायणगाव

ओझर येथील मांडेमळ्यात विलास सोनू कवडे यांच्या उसाच्या शेतात आज गुरुवारी सकाळी ऊसतोड चालू असताना बिबट्याचे बछडे आढळून आले.

Web Title: Two leopard cubs found in a sugarcane field at Ozark

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.