दोन अल्पवयीन मुलींवर हिंजवडीमध्ये बलात्कार, एकीचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2018 06:42 AM2018-09-21T06:42:56+5:302018-09-21T06:43:06+5:30
ऊसतोड मजुरांच्या दोन अल्पवयीन मुलींवर हिंजवडीजवळ बलात्कार करण्यात आला.
पिंपरी (पुणे) : ऊसतोड मजुरांच्या दोन अल्पवयीन मुलींवर हिंजवडीजवळ बलात्कार करण्यात आला. त्यातील एकीचा बुधवारी मृत्यू झाला. तिच्यावर दोघांनी बलात्कार केला होता. पोलिसांनी गणेश निकमला अल्पवयीन साथीदारासह अटक केली आहे. रविवारच्या या घटनेने परिसरात संतापाची लाट उमटली आहे.
संत तुकाराम साखर कारखान्याचे ऊसतोड कामगार पालात राहत असून, त्याशेजारीच आरोपी राहत. सहावीत शिकणाऱ्या १२ वर्षांच्या या मुली मंदिरापाशी गेल्या. आरोपींनी त्यांना खाऊचे आमिष दाखवून झुडुपांत नेले. तेथे गणेशने दोघींवर, तर साथीदाराने एकीवर बलात्कार केला. दुसºया दिवशी एकीच्या पोटात दुखू लागले. तिला औंधच्या सर्वोपचार रुग्णालयात नेले. तपासणीत तिच्यावर बलात्कार झाल्याचे निष्पन्न झाले. ती बोलण्याच्या स्थितीत नव्हती. नंतर मरण पावली. पोलिसांनी दुसºया मुलीची भेट घेतल्यानंतर हे प्रकरण उघड झाले.
> पोलीस कोठडी
पोलिसांनी आरोपींवर बाललैंगिक अत्याचार कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. आरोपी गणेश निकम हा जळगाव जिल्ह्यातील आंचलगाव येथील रहिवासी आहे. न्यायालयाने त्याला २५ सप्टेंबरपर्यंत पोलीस
कोठडी सुनावली आहे. त्याचा
साथीदार अल्पवयीन आहे. सामूहिक बलात्काराच्या या घटनेचे तीव्र
पडसाद उमटले असून, नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.