Pune Crime: येरवडा कारागृहात सापडले दोन मोबाइल; चार कैद्यांविरोधात गुन्हा दाखल

By नितीश गोवंडे | Published: August 9, 2023 04:20 PM2023-08-09T16:20:47+5:302023-08-09T16:25:14+5:30

कारागृह प्रशासनाच्या वतीने चार कैद्यांविरोधात येरवडा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे...

Two mobiles found in Yerawada Jail; Crime registered against 4 prisoners pune crime | Pune Crime: येरवडा कारागृहात सापडले दोन मोबाइल; चार कैद्यांविरोधात गुन्हा दाखल

Pune Crime: येरवडा कारागृहात सापडले दोन मोबाइल; चार कैद्यांविरोधात गुन्हा दाखल

googlenewsNext

पुणे : येरवडा मध्यवर्ती कारागृहामध्ये कैद्यांना मोबाइल वापरण्यास बंदी असतानाही बेकायदेशीररित्या कारागृहात मोबाइलचा कैद्यांनी वापर केल्याप्रकरणी कारागृह प्रशासनाच्या वतीने चार कैद्यांविरोधात येरवडा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

त्यानुसार राजु तुकाराम अस्वले, सचिन उर्फ पप्पू दत्तात्रय घोलप, आकाश उत्तम रणदिवे आणि तालीम आसमोहम्मद खान या चार आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या आरोपींच्या ताब्यातून पोलिसांनी सॅमसंग कंपनीचा काळ्या रंगाचा मोबाइल, बॅटरी, सिमकार्ड तसेच कचाडा कंपनीचा राखाडी रंगाचा एक मोबाइल जप्त करण्यात आला. याप्रकरणी येरवडा मध्यवर्ती कारागृहाचे तुरुंगाधिकारी रेवनाथ कडू कानडे (५४) यांनी आरोपींविरोधात येरवडा पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ५ ऑगस्ट रोजी दुपारी साडेचार ते ६ ऑगस्ट रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास येरवडा मध्यवर्ती कारागृहात तक्रारदार कानडे हे तुरुंगाधिकारी म्हणून काम करत होते. त्यावेळी न्यायालयीन बंदी तालीम आसमोहम्मद खान हा मोबाइल वापरत असल्याची गोपनीय माहिती त्यांना मिळाली. त्यामुळे खानला बोलवून त्याची अंगझडती घेतली असता, त्याच्या खिशात एक राखाडी रंगाचा कचाडा कंपनीचा मोबाइल फोन बॅटरीसह लपवून ठेवलेल्या अवस्थेत आढळून आला. तसेच अन्य कैद्यांची तपासणी केली असता, टिळक सेपरेट खोली क्रमांक ३० मध्ये झडती घेतली असता, न्यायालयीन बंदी राजू तुकाराम अस्वले याच्या अंगझडतीत पँटच्या खिशात एक काळ्या रंगाचा मोबाइल फोन बॅटरीसह व एअरटेल कंपनीचे चिन्ह असलेले सिम कार्ड लपवून ठेवलेल्या अवस्थेत आढळून आले.

चौकशीदरम्यान, कैदी राजू असवले, सचिन घोलप, आकाश रणदिवे यांनी आपापसात संगनमत करून येरवडा मध्यवर्ती कारागृहात कटकारस्थान करून सॅमसंग कंपनीचा मोबाईल फोन बॅटरीसह व सिम कार्डसह कारागृहाबाहेरून घेऊन जात त्याचा वापर करून कारागृह नियमाचा भंग केल्याप्रकरणी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणाचा पुढील तपास येरवडा पोलिस ठाण्याच्या पोलिस उपनिरीक्षक सुरेखा गाताडे या करत आहेत.

Web Title: Two mobiles found in Yerawada Jail; Crime registered against 4 prisoners pune crime

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.