दोन महिन्यांत ९ बिबटे पकडले

By admin | Published: June 30, 2015 12:03 AM2015-06-30T00:03:31+5:302015-06-30T00:03:31+5:30

निमगाव सावा (ता. जुन्नर) येथील कारफाट्याजवळ रविवारी संध्याकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास सहा वर्षे वयाचा नर बिबट्या जेरबंद करण्यात आला.

In two months, 9 people were caught | दोन महिन्यांत ९ बिबटे पकडले

दोन महिन्यांत ९ बिबटे पकडले

Next

निमगाव सावा : निमगाव सावा (ता. जुन्नर) येथील कारफाट्याजवळ रविवारी संध्याकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास सहा वर्षे वयाचा नर बिबट्या जेरबंद करण्यात आला. दोन महिन्यात ९ बिबटे पकडण्यात आले आहेत.
येथील कारफाटा परिसरातील मीरा वस्ती परिसरात रज्जाक रहिमान पटेल यांची केळीची बाग आहे. या बागेत आठ दिवसांपूर्वी स्वत: रज्जाक पटेल व अनेक ग्रामस्थांनी नर व मादी बिबट्या, तसेच त्यांचे दोन बछडे पाहिले होते. त्यांनी वनविभागाला कळविल्याने वनविभागाने त्वरित या ठिकाणी पिंजरा लावला होता.
आठ दिवसांच्या कालावधीत या बिबट्यांनी या परिसरातील अनेक कुत्री, शेळ्या व कालवडी फस्त केल्याने ग्रामस्थ भयभीत झाले होते. अखेर रविवारी भक्ष्याच्या शोधात निघालेल्या बिबट्याला पिंजऱ्यातील शेळी दिसली. त्याने त्वरित शेळीकडे धाव घेतली आणि क्षणार्धात बिबट्या जेरबंद झाला. वनविभागाचे कर्मचारी त्वरित
घटनास्थळी दाखल झाले व या बिबट्याला माणिकडोह येथील निवारा केंद्रात घेऊन गेले. हा नर जातीचा बिबट्या जरी जेरबंद झाला असला, तरीही या परिसरात अजून एक मादी व दोन बछडे असल्याने ग्रामस्थ भयभीतच आहेत.
या वस्तीत सुमारे ५० ते ६० ग्रामस्थ राहत असून, जाण्या-येण्याचा मुख्य रस्ता या केळीच्या बागेजवळूनच जात असल्याने ग्रामस्थांसह शाळकरी मुलेही धास्तावली आहेत. त्वरित पिंजरा लावावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. (वार्ताहर)

पिंपरगणेत दोन शेळ्या फस्त
तळेघर : आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागात आहुपे खोऱ्यातील पिंपरगणे (वाघोबाचीवाडी) येथे बिबट्याने दोन शेळ्या ठार, तर एक जखमी केली आहे.
शेतकरी मारुती पारधी यांच्या घरापासून अवघ्या १५ मीटर अंतरावर रात्री १२च्या सुमारास बिबट्याने शेळ्यांवर झडप घातली. भीमाशंकर अभयारण्य परिसरामध्ये यापूर्वी बिबट्याच्या पाऊनखुणा सापडल्या होत्या. गेल्या दोन वर्षांपासून शेळ्यांवर होणाऱ्या हल्ल्यांमुळे या अभयारण्यामध्ये बिबट्याच्या वास्तव्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. गेल्या वर्षी किसन सावळेराम असवले यांच्या शेळ्यांवर झडप घालून पाच वर्षांची शेळी बिबट्याने फस्त केली होती. त्याचप्रमाणे साकेरी गावामध्येही असाच प्रकार घडल्याचे वन विभागामार्फत सांगण्यात आले. वन परिक्षेत्र अधिकारी तुषार ढमढेरे यांच्या मार्गदर्शनाखाली पंचनामा केला.

Web Title: In two months, 9 people were caught

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.