भिशी फसवणूकप्रकरणी आणखी दोघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2021 04:08 AM2021-07-04T04:08:05+5:302021-07-04T04:08:05+5:30

यापूर्वी फसवणूक करून ९ महिन्यांपासून फरार असणारे भरतकुमार चरणदास जोशी (वय ६३) व त्यांचे मुले दीपक भरतकुमार जोशी (वय ...

Two more arrested in Bhishi fraud case | भिशी फसवणूकप्रकरणी आणखी दोघांना अटक

भिशी फसवणूकप्रकरणी आणखी दोघांना अटक

googlenewsNext

यापूर्वी फसवणूक करून ९ महिन्यांपासून फरार असणारे भरतकुमार चरणदास जोशी (वय ६३) व त्यांचे मुले दीपक भरतकुमार जोशी (वय ३६), हिरेन भरतकुमार जोशी (वय ३४, तिघेही रा. शिर्के हॉस्पिटल जवळ, उरुळी कांचन, मूळ रा. सहयोगनगर, भूज, कच्छ, गुजरात) यांना पाकिस्तान सीमारेषा भूज, कच्छ (गुजरात) येथे जाऊन अटक करण्यात आली होती.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी दिलेल्या माहितीनुसार तिघांनी फिर्यादी व इतर एकूण ११ जणांना ७ वर्षांच्या कालावधीवर मुदतीवर, आकर्षक रक्कम परताव्याचे आमिष दाखवून त्यांचा विश्वास संपादन करून त्याच्याकडूून वेळोवेळी बँकेच्या खात्यावरून व आरटीजीएसने रक्कम घेऊन त्यांना कसल्याही प्रकारचा परतावा न देता त्यांची आर्थिक फसवणूक केली. तसेच काही लोकांची लिलावाच्या भिशीच्या नावाने पैसे धनादेश व रोखीने घेऊन त्यांना परत न देता त्यांनी सन २०१३ ते २०१९ या कालावधीमध्ये एकूण ३ कोटी ५९ लाख ९६ हजार १३० रुपयांची फसवणूक केल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास आले आहे. भिशीत गुंतवणुकीच्या नावाखाली यांनी उरुळी कांचन, लोणी काळभोर, हडपसरसह पूर्व हवेलीमधील सुमारे पाचशेंहून अधिक मोठ्या असामींकडून सुमारे दोनशे कोटींहून अधिकची माया जमा केली असल्याची चर्चा आहे. ज्या नागरिकांची वरील पद्धतीने फसवणूक झाली आहे, त्यांनी लोणी काळभोर पोलीस ठाणे, पुणे शहर येथे संपर्क साधावा, असे अवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी केले आहे.

Web Title: Two more arrested in Bhishi fraud case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.