कल्याणीनगर अपघात प्रकरणात आणखी दोघांना अटक- अल्पवयीन मुलाच्या रक्ताचे नमुने बदल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2024 10:35 AM2024-08-20T10:35:29+5:302024-08-20T10:36:10+5:30

कल्याणीनगर भागात १९ मे रोजी मध्यरात्री अपघात झाला. भरधाव मोटारीच्या धडकेत संगणक अभियंता तरुण-तरुणीचा मृत्यू झाला होता.

Two more arrested in Kalyaninagar accident case minor's blood samples changed | कल्याणीनगर अपघात प्रकरणात आणखी दोघांना अटक- अल्पवयीन मुलाच्या रक्ताचे नमुने बदल

कल्याणीनगर अपघात प्रकरणात आणखी दोघांना अटक- अल्पवयीन मुलाच्या रक्ताचे नमुने बदल

पुणे : अल्पवयीन मुलाचे बांधकाम व्यावसायिक वडील विशाल अगरवाल यांना रक्ताचे नमुने बदल करण्यासाठी मदत केल्याप्रकरणी गुन्हे शाखेने आणखी दोघांना अटक केली. ससूनमधील डाॅ. अजय तावरेच्या संपर्कात आल्याचे तपासात उघड झाले. आदित्य अविनाश सूद (वय ५२), आशिष सतीश मित्तल (वय ३६) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

 कल्याणीनगर भागात १९ मे रोजी मध्यरात्री अपघात झाला. भरधाव मोटारीच्या धडकेत संगणक अभियंता तरुण-तरुणीचा मृत्यू झाला होता. अपघातानंतर अल्पवयीन मुलाचे वडील विशाल याने ससूनमधील डाॅ. तावरेशी संपर्क साधला. त्यासाठी मकानदार, गायकवाड यांच्या माध्यमातून चार लाखांची रक्कम देण्यात आली होती. अगरवालचे परिचित आदित्य सूद, आशिष मित्तल यांची डाॅ. तावरेशी ओळख होती. त्यांच्या माध्यमातून अगरवालने डाॅ. तावरेशी संपर्क साधल्याचे तपासात उघड झाले. गुन्हे शाखेकडून सोमवारी रात्री उशीरा सूद आणि मित्तल यांना अटक करण्यात आली. दोघांना अटक केल्यानंतर आज दुपारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहपोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त शैेलैश बलकवडे, उपायुक्त निखिल पिंगळे, सहायक आयुक्त गणेश इंगळे आणि पथकाने ही कारवाई केली.

Web Title: Two more arrested in Kalyaninagar accident case minor's blood samples changed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.