वनराज आंदेकर खून प्रकरणात आणखी दोघांना अटक; आतापर्यंत ३ अल्पवयीनांसह २१ जणांना अटक

By नितीश गोवंडे | Published: September 12, 2024 05:21 PM2024-09-12T17:21:32+5:302024-09-12T17:21:48+5:30

आंदेकर खून प्रकरणात प्रत्यक्षदर्शी साक्षीदार असलेल्या शिवम आंदेकर याच्या जीवाला असलेला धोका लक्षात घेऊन त्याला पोलिस संरक्षण देण्यात आले आहे

Two more arrested in Vanraj Andekar murder case So far 21 persons including 3 minors have been arrested | वनराज आंदेकर खून प्रकरणात आणखी दोघांना अटक; आतापर्यंत ३ अल्पवयीनांसह २१ जणांना अटक

वनराज आंदेकर खून प्रकरणात आणखी दोघांना अटक; आतापर्यंत ३ अल्पवयीनांसह २१ जणांना अटक

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर खून प्रकरणात पसार झालेल्या दोघांना गुन्हे शाखेने अटक केली. आंदेकर खून प्रकरणात आतापर्यंत तीन अल्पवयीनांसह २१ जणांना अटक करण्यात आली आहे. आतापर्यंत आरोपींकडून आठ पिस्तुले, १३ काडतुसे, सात दुचाकी आणि एक कार जप्त करण्यात आली आहे.

आंदेकर खून प्रकरणात मुख्य सूत्रधार सोमनाथ गायकवाड, शुभम दहिभाते, आंदेकर यांची बहीण संजीवनी कोमकर, तिचा पती प्रकाश, दीर गणेश यांंना अटक करण्यात आली. या प्रकरणात कोयते, तसेच पिस्तूल पुरविणारा आरोपी संगम वाघमारे यालादेखील नुकतीच अटक करण्यात आली होती. पसार झालेले आरोपी सागर पवार, साहिल दळवी यांना गुन्हे शाखेच्या युनिट एक आणि खंडणीविरोधी पथकाने बुधवारी (दि. ११) रात्री उशिरा अटक केली. गुन्हे शाखेचे अपर पोलिस आयुक्त शैलेश बलकवडे, पोलिस उपायुक्त निखिल पिंगळे, सहायक आयुक्त गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक शब्बीर सय्यद, प्रताप मानकर, उपनिरीक्षक अविनाश लोहोटे, राहुल मखरे आणि पथकाने ही कारवाई केली.

आंदेकर खून प्रकरणात प्रत्यक्षदर्शी साक्षीदार असलेल्या शिवम आंदेकर याच्या जीवाला असलेला धोका लक्षात घेऊन त्याला पोलिस संरक्षण देण्यात आले आहे. १ सप्टेंबर रोजी वनराज यांच्यावर नाना पेठेत पिस्तुलातून गोळीबार, तसेच कोयत्याने वार करून खून करण्यात आला. त्यावेळी शिवम त्यांच्यासोबत होता. हल्लेखोरांनी त्यालाही मारण्याचा प्रयत्न केला. मात्र, प्रसंगावधान राखून तो पळाल्याने त्याचा जीव वाचला. त्याला पोलिस संरक्षण देण्याची मागणी त्याच्या वकिलांनी केली होती, अशी माहिती पोलिसांनी दिली.

Web Title: Two more arrested in Vanraj Andekar murder case So far 21 persons including 3 minors have been arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.