कुख्यात गुंड रासकर खून प्रकरणातील आणखी दोघांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2021 06:12 PM2021-08-03T18:12:11+5:302021-08-03T18:13:15+5:30

आरोपींनी जमवलेली धारदार हत्यारेही पोलिसांच्या ताब्यात

Two more arrested in notorious goon Raskar murder case | कुख्यात गुंड रासकर खून प्रकरणातील आणखी दोघांना अटक

कुख्यात गुंड रासकर खून प्रकरणातील आणखी दोघांना अटक

googlenewsNext
ठळक मुद्देगुंड गणेश रासकरचा डोक्यात गोळ्या घालून केला होता खून

नीरा : पुरंदर तालुक्यातील नीरेत कुख्यात गुंड गणेश रासकरचा खून करण्यासाठी धारदार हत्यारांची जमवाजमव केली होती. ती हत्यारे एका खोलीतून पोलिसांनी ताब्यात घेताना खुनाच्या कटातील आणखी २ संशयितांना जेजुरी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या दोघांवर हत्यारबंदी कायदा प्रमाणे कारवाई करण्यात आलेली असून रासकर हत्या प्रकरणात आतापर्यंत सहा संशयीतांना अटक केल्याची माहिती जेजुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनील महाडीक यांनी दिली आहे.

जेजुरी पोलीसांना दिलेल्या माहितीनुसार, सोमवार २ ऑगस्टला जेजुरी पोलीस ठाण्यास खात्रीशीर माहिती मिळाली की पुरंदर तालुकयातील नीरा येथे काही दिवसांपूर्वी गणेश रासकर या गुंडाचा खून झालेला होता. त्याचा खून करण्यापूर्वी आरोपी गौरव लकडे, निखील रवींद्र ढावरे व कटात सहभागी असणारा गणेश जाधव यांनी गणेश रासकर याला संपवण्यासाठी हत्यारांची जमवाजमव केली होती. ही धारदार हत्यारे अविनाश विष्णू भोसले (वय २७) व विठ्ठल अशोक मोहिते (वय २१) दोघेही रा. नीरा प्रभाग क्र.६ यांच्या ताब्यात दिली होती.

त्यांनी जर कोणास माहिती दिली तर त्यांना सुद्धा मारण्याची धमकी दिली होती. परंतु वरील तिघांनी त्याचा पिस्तुलाने गोळ्या घालून खून केला होता. परंतु जी धारदार हत्यारे गणेश रासकरला मारण्यासाठी आणून ठेवली होती. ती एका खोलीत वरील दोघांच्या ताब्यात अद्यापही आहेत, अशी माहिती मिळाल्याने पोलीस पथकाने नीरा मध्ये जाऊन शोध घेतला. त्याठिकाणी ६ धारदार हत्यारे मिळाली. त्यामुळे सध्या जिल्हाधिकारी यांचा हत्यारबंदी आदेश लागू आहे, त्याचेही उल्लंघन झालेला आहे. वरील अविनाश भोसले, विठ्ठल मोहिते व जेलमध्ये असणारे निखील ढावरे, गौरव लकडे व गणेश लक्ष्‍मण जाधव, जगन्नाथ जाधव यांच्यावर महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७ व हत्यारबंदी कायदा कलम ४२५ प्रमाणे कारवाई करण्यात आलेली आहे.

Web Title: Two more arrested in notorious goon Raskar murder case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.