डी. एस. कुलकर्णींवर आणखी दोन गुन्हे दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2018 07:10 PM2018-07-20T19:10:53+5:302018-07-20T19:12:21+5:30
गुंतवणुकदारांची फसवणूक केल्याप्रकणी अटकेत असलेले डीएसके यांच्यावर आणखी दोन गुन्हे करण्यात आले आहेत . व्यवसायातील कर बुडवून शासनाची फसवणूक केल्याचे दोन गुन्हे शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आले आहेत.
पुणे : गुंतवणुकदारांची फसवणूक केल्याप्रकणी अटकेत असलेले डीएसके यांच्यावर आणखी दोन गुन्हे करण्यात आले आहेत . व्यवसायातील कर बुडवून शासनाची फसवणूक केल्याचे दोन गुन्हे शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आले आहेत. डीएसके यांच्यासह त्यांची पत्नी आणि मुलगा यांच्यावर शासनाचा ५२ कोटी २६ लाख ४२ हजार ८०० रुपयांचा कर बुडवल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
डीएसके डेव्हलपर्स लिमीटेड या कंपनीने २००६ ते २००९ या काळात व्यावसायातील शासनाचा कर भरला नाही. शासनाचा कर बुडवण्याच्या उद्देशाने हा कर भरला नसल्याची फिर्याद विक्रीकर निरीक्षकांनी दिली. डिएसके डेव्हलपर्स लि. या कंपनीने कर आणि त्यावरील व्याज अशी एकूण १३ कोटी ६ लाख ९९ हजार ५०३ रुपयांची शासनाची फसवणूक केली.
दिपक सखाराम कुलकर्णी, हेमंती दिपक कुलकर्णी आणि शिरीष दिपक कुलकर्णी यांच्यावर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी विक्रीकर निरीक्षक गणेश पृथ्वीराज कुलकर्णी आणि अमोल बाळाभाऊ आहेर यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.