आणखी दोन साथीदारांना अटक

By admin | Published: September 26, 2015 01:51 AM2015-09-26T01:51:29+5:302015-09-26T01:51:29+5:30

लोणावळा दुहेरी हत्याकांडातील सूत्रधार कुख्यात गुंड किसन नथू परदेशी याच्या आणखी दोन साथीदारांना अटक करण्यात आली आहे.

Two more friends arrested | आणखी दोन साथीदारांना अटक

आणखी दोन साथीदारांना अटक

Next

लोणावळा : लोणावळा दुहेरी हत्याकांडातील सूत्रधार कुख्यात गुंड किसन नथू परदेशी याच्या आणखी दोन साथीदारांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी अटक आरोपींची संख्या आता नऊ झाली आहे.
आकाश सतिश चंडालिया (वय २१, रा. येरवडा, पुणे) आणि आदेशमहाराज उर्फ संभाजी घाडगे (वय ६२, रा. अहमदनगर) यांना सायंकाळी कामशेत परिसरात अटक करण्यात आली. कार्बाईन मशिनगन व जिवंत काडतुसांसह गुरुवार, दि. १७ सप्टेंबरच्या रात्री पोलिसांच्या सापळ्यात सापडलेला परदेशी व त्यांच्या सहा साथीदारांना शुक्रवारी वडगाव न्यायालयाने पुन्हा ७ दिवसांची वाढीव पोलीस कोठडी दिली आहे.
तपासामध्ये परदेशी याने दुहेरी हत्याकांडाची कबुली दिली. तसेच लोणावळ्याचे विद्यमान नगराध्यक्ष अमित गवळी व स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे
राष्ट्रीय अध्यक्ष रमेश साळवी यांना
मारण्याचा कट रचत, कामशेत येथील काही व्यापारी व कार्ला गावातील एकाचे अपहरण करण्याचा कट रचल्याची कबुली दिल्याने घटनेचे गांभीर्य वाढले आहे. (वार्ताहर)

Web Title: Two more friends arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.