शहरात 'ओमायक्रॉन'चे आणखी दोन नवे रुग्ण; रँन्डम तपासणीत आढळले पॉझिटिव्ह
By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2022 09:09 PM2022-01-01T21:09:19+5:302022-01-01T21:13:08+5:30
आतापर्यंत परदेशातून शहरात आलेले व त्यांच्या संपर्कातील अशा १६१८ जणांची तपासणी करण्यात आली. त्यातील १५०९ जणांचे अहवाल प्राप्त झाले. परदेशातून आलेले ३८ तर त्यांच्या संपर्कातील २८ जण पॉझिटीव्ह आले.
पिंपरी - पिंपरी-चिंचवड शहरात शनिवारी ओमायक्रॉनचे नवीन दोन रुग्ण आढळून आले आहेत. रँन्डम तपासणीत दोन महिला रुग्णांचा 'ओमायक्रॉन'चा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. एका महिलेचे वय २२ तर एका महिलेचे वय २३ वर्ष, असे आहे. या दोन्ही रु्गणांची प्रकृती स्थिर असून, त्यांना रुग्णालयात दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
आतापर्यंत परदेशातून शहरात आलेले व त्यांच्या संपर्कातील अशा १६१८ जणांची तपासणी करण्यात आली. त्यातील १५०९ जणांचे अहवाल प्राप्त झाले. परदेशातून आलेले ३८ तर त्यांच्या संपर्कातील २८ जण पॉझिटीव्ह आले. तर, १४४३ जणांचे रिपोर्ट निगेटीव्ह आले आहेत. परदेशातून आलेल्या ३८ पॉझिटीव्ह रुग्णांपैकी १४ जणांना ओमायक्रॉनची बाधा झाली आहे. त्यांच्या संपर्कातील २८ पॉझिटीव्ह रुग्णांपैकी ११ ओमायक्रॉन पॉझिटीव्ह होते. तर, रँन्डम तपासणीत ३ रुण ओमायक्रॉन पॉझिटीव्ह आले आहेत. १५ जणांनी ओमायक्रॉनवर मात केली आहे. तर, १३ सक्रिय रुग्णांवर उपचार सुरु असून सर्वांची प्रकृती स्थिर असल्याचे वैद्यकीय विभागप्रमुख डॉ. लक्ष्मण गोफणे यांनी सांगितले.
शहरात आतापर्यंत ओमायक्रॉनच्या २८ रुग्णांची नोंद झाली आहे. ओमायक्रॉन व्हेरिएंटच्या अनुषंगाने महापालिकेतर्फे शहरात तपासणी मोहीम सुरू आहे.