डोक्यात दगड घालून खून करणारे दोघे जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2021 07:27 PM2021-03-20T19:27:32+5:302021-03-20T19:29:06+5:30

पोलिसांना आपली ओळख सांगेल या भीतीने घातला डोक्यात दगड

Two murderers arrested by throwing stones at their heads | डोक्यात दगड घालून खून करणारे दोघे जेरबंद

डोक्यात दगड घालून खून करणारे दोघे जेरबंद

googlenewsNext
ठळक मुद्देतीन पथकाने केला २५० हून अधिक सीसीटीव्ही फुटेजचा तपास

एका व्यक्तीला मारहाण करून एटीएममध्ये जाऊन त्याच्याकडून पैसे काढून घेतले. त्यानंतर पोलिसांना आपली ओळख सांगेल या भीतीने डोक्यात दगड घालून खून करणाऱ्या दोन सराईतांना पकडण्यात हडपसरपोलिसांना यश आले आहे. हडपसर पोलीस स्टेशनच्या वतीने अधिकारी- अंमलदारांच्या तीन पथकाने २५० हून अधिक सीसीटीव्ही फुटेजचा तपास करून आरोपीला पकडल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण कदम यांनी दिली.

सतीश संजय सुतार (रा. नऱ्हे, सिंहगड रोड, पुणे) आणि मिलिंद सोनबा पवळे (रा. धायरी फाटा) असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. राहुल श्रीकृष्ण नेने (वय ४५, रा. सदाशिव पेठ) यांचा खून करून आरोपींनी मृतदेह पर्वती येथील कालव्यात टाकला होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हडपसर शिंदेवस्ती येथील कालव्यात १५ मार्चला मृतदेह वाहत आला होता. त्याचा तपास करण्यासाठी तीन पथकातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी २५० अधिक सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधाराने मृत व्यक्ती सिंहगड भागातील असल्याचे समजले. त्यानुसार धायरी-सिंहगड रोड, संतोष हॉल, राजाराम पुल, दांडेकर पुल या रस्त्यावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यामध्ये आरोपी मृत व्यक्तीला दुचाकीवर घेऊन जात असताना दिसून आले. त्यानुसार तपासात असे आढळून आले की,  आरोपीने मृत व्यक्तीला मारहाण करून एटीएममध्ये नेऊन पैसे काढून घेतले. मात्र, तो आपली ओळख पोलिसांना सांगेल या भीतीने त्याच्या डोक्यात दगड घालून गंभीर जखमी केले. नंतर पर्वती येथील कालव्यात फेकून दिल्याची आरोपींनी कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. हडपसर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण कदम आणि त्यांच्या पथकाने ही कामगिरी केली.
 

Web Title: Two murderers arrested by throwing stones at their heads

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.